पहिलीच्या प्रवेशात झेडपी शाळांचा डंका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

सांगली - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ज्ञानरचनावाद, डिजिटल स्कूल, ई-लर्निंगमुळे गुणवत्तेत झालेली वाढ, मातृभाषेतील शिक्षणाचे वाढलेले महत्त्व आदींमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसते. या शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी ११ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी पहिलीत प्रवेश घेतल्याची आकडेवारी प्राथमिक शिक्षण विभागाकडे  आहे. त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ४ हजार  ५१९ विद्यार्थी संख्या वाढली. सलग गेली तीन  झेडपीच्या पहिलीच्या वर्गाचा पट वाढतो आहे. हे सुचिन्ह मानले जाते. 

इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडे विद्यार्थी,  पालकांचा ओढा वाढत आहे. या शाळांशी स्पर्धा करत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनीही आघाडी घेतली आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण संचालनालयाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रम सुरू केला. त्यास पहिल्याच वर्षी ग्रामीण भागात यश येत असल्याचे दिसते. ‘झेडपी’च्या १७१० प्राथमिक शाळांपैकी अवध्या तीस शाळांचा अपवाद वगळता सर्व शाळांमध्ये ज्ञानरचनावाद संकल्प राबवला जातो. ४५० शाळांमध्ये डिजिटल क्‍लासरूम आहेत. त्यासाठी तब्बल चार कोटींचा लोकसहभाग घेण्यात आला आहे. १० शाळा पूर्णपणे टेक्‍नोसॅव्ही बनल्या असून, या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३० हून अधिक शाळा ‘आयएसओ’ मानांकित झाल्या आहेत. 

आमदार दत्तक शाळा, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक संघटनांनी दत्तक शाळा असे उपक्रम राबवून शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासह भौतिक सुविधा वाढवण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून खासगी शाळांचे आव्हान असतानाही यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसते. गेल्या वर्षी ७ हजार ४७ विद्यार्थी पहिलीच्या वर्गात  दाखल झाले होते. यंदा त्यात वाढ होऊन ११ हजार ५६६ विद्यार्थी पहिलीच्या वर्गात दाखल झाले आहेत.

गुणवत्तावाढीवर भर 
प्राथमिक शाळेतील नव्या दमाचे शिक्षकांनी शाळांची गुणवत्ता वाढीवर भर दिला आहे. बऱ्यापैकी शिक्षक स्पर्धा परीक्षेतून आले आहेत. यामुळे त्यांचे लक्ष गुणवत्ता टिकवण्यावर असते. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सुधारित पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही झेडपीच्या शाळा पुढे आहेत. 

Web Title: sangli news zp school