सांगलीच्या अधिकाऱ्यांनी दिले सोलापूरच्या कामाचे पैसे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

आटपाडी - येथील सामाजिक वनीकरण विभागाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सोलापूर जिल्हा हद्दीतील वृक्षलागवड आणि संगोपनाची दीड वर्षे बिले काढली आहेत. असा प्रकार नुकताच उघड झाला. जिल्ह्यात मजूर नसतानाही बिले काढल्याची तक्रार शेटफळे ग्रामस्थांनी तहसीलकडे तक्रारी केल्या आहेत.  या वादग्रस्त कामाचे मस्टर तातडीने बंद करण्याचे  आदेश देण्यात आलेत.

रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवड कामात अपहाराचा प्रकार सुरू आहे. वनीकरण विभागाने रोजगार हमी योजनेतून गावोगावचे नेते असलेल्या ठेकेदारांच्या माध्यमातून वृक्षलागवड केली. संगोपन, पाणी घालण्यासाठी मजुरी काढली जाते. झाडे संभाळण्यासाठी शेण, वरखते आदीही खर्च दाखवला जातो. प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. एवढेच नाही तर शेटफळे ग्रामपंचायतीमार्फत लागवड केलेली शेटफळे-बनगरवाडी, शेटफळे-लेंगरेवाडी, शेटफळे- चिंध्यापीर या रस्त्यावरील सोलापूर जिल्हा हद्दीतील वृक्ष दाखवून दीड वर्षे मजुरी काढण्याचा प्रताप घडल्याचे उजेडात आले आहे.

श्री. पडळकर म्हणाले,‘‘सोल्हापूर जिल्ह्यातील वृक्षाचा सांगलीतील अधिकाऱ्यांशी संबंध नसताना मजुरी काढली जाते. तशी तक्रार शेटफळे ग्रामस्थांनी महसूलकडे केली आहे. वनमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची भेटही घेणार आहोत.’’

वनीकरण अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा हद्दीतील झाडे दाखवून दीड वर्षे मजुरी कढली आहे. चौकशी करून संबंधितांकडून वसुली करावी.
-प्रकाश गायकवाड, सदस्य, ग्रामपंचायत

शेटफळेत वृक्षलागवडीची बोगस कामे आहेत. कामावर मजूर नाहीत. अधिकाऱ्यांयांनी कामाचे मास्टर बंद ठेवावे.
-ब्रह्मदेव पडळकर, सभापती, समजाकल्याण समिती

Web Title: Sangli officer paid the money for Solapur work