शहर ठाण्यात "झिरो' पोलिसाला अप्पर अधीक्षकांनी हेरले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

सांगली - शहर पोलिस ठाणे आवारात आणि सर्व विभागात वावर असलेल्या "झिरो' पोलिसाला अप्पर अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी पार्किंगजवळ नेमके हेरले. प्रश्‍नांची सरबत्ती केल्यानंतर त्याला काही सांगता येईना. दुचाकी लावायला येथे आलो होतो असे उत्तर दिले. पोलिस ठाण्यात दुचाकी का लावतोस? म्हणून त्याच्या दुचाकीचा नंबर टिपून छायाचित्र घेण्यास श्री. उपाध्याय यांनी सांगितले. तसेच चौकशीचे आदेशही दिले. 

शहर पोलिस ठाण्यात बऱ्याच दिवसांपासून या "झिरो' पोलिसाचा वावर आहे. पोलिसांचा खबऱ्या असल्याप्रमाणेच तो सर्वत्र फिरतो. नवख्या पोलिसांना तर पोलिसच वाटतो. टी शर्ट आणि जीन्स पॅंट आणि थाटात सर्वत्र फिरत असल्यामुळे त्याला विचारण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. काही अधिकाऱ्यांच्या जवळ ऊठबस असल्यामुळे विचारणा करण्याचा प्रश्‍नच नव्हता. पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे रोखले आहेत. अधिकारी व कर्मचारी यांची कॅमेऱ्यातील चित्रीकरणावर नजर असते. तरीही या पठ्ठयाचा नेहमीचा वावर पाहून त्याला अडवले नाही. 

पोलिस ठाण्यातील एका वादाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी श्री. उपाध्याय काल आले. पार्किंगजवळ काही तरुण थांबले होते. त्यांना का थांबलात म्हणून विचारले. त्यांनी योग्य ती उत्तरे दिली. तेवढ्यात हा खबरीलाल कम झिरो पोलिसही तेथून सटकण्याचा प्रयत्न करू लागला. दुचाकीजवळ तो पोहोचला. तेवढ्यात श्री. उपाध्याय यांनी त्याला हेरले. बोलवून घेतले. का आलास? म्हणून विचारले. तेव्हा खबरी असल्याचे त्याला सांगता आले असते. परंतु सांगण्याचे धाडस दाखले नाही. दुचाकी लावायला ठाण्यात आलो होतो असे उत्तर दिले. त्यामुळे श्री. उपाध्याय यांनी पोलिस कर्मचाऱ्याला बोलवून त्याचा नाव, पत्ता, मोबाईल नंबर, गाडी नंबर आणि छायाचित्र घेऊन चौकशी करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे पोलिसांने ते काम पार पाडले. "झिरो' पोलिसाची पुढे काय चौकशी झाली ते समजले नाही. परंतु एका नजरेत श्री. उपाध्याय यांनी ज्याला हेरले तो दररोजच पोलिस ठाण्यात थाटात कसा वावरतो ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Web Title: sangli police station