सांगली पोलिस राज्यात भारी.... गुन्हे अन्‌ गुन्हेगार तपास प्रणालीत अव्वल 

शैलेश पेटकर
Thursday, 10 September 2020

सांगली-  सीसीटीएनस (क्राईम ऍण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम) अर्थात गुन्हे आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणालीच्या राज्यस्तरीय कामकाजात सांगली जिल्हा पोलिस दलाने राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये दैनंदिन प्रभावी वापर, अचूकता आणि नागरिकांच्या ई-तक्रारींची पूर्तता यामुळे 100 टक्के गुण जिल्हा पोलिस दलाला मिळाले आहेत. 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये "सीसीटीएनएस' प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे. नागरिकांना कोणताही त्रास न होता सर्व पोलिस ठाण्याचे कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करत ऑनलाइन कामावर भर दिला जात आहे. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. कच्ची नोंद पद्धत बंद करून ऑनलाइन तक्रारी नोंद करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार सर्व पोलिस ठाण्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. तंत्रज्ञानावर आधारित कामकाजात पोलिसिंग कामात सातत्य ठेवल्यानेच प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

कोरोनाचा कहर लक्षात घेता, पोलिस दलही कोरोना नियंत्रणासाठी व्यस्त आहे. अशा परिस्थितीतही सीसीटीएनएस प्रणालीचा योग्य वापर करण्यात आला आहे. या प्रणालीच्या कामकाजाच्या नोडल अधिकारी मनीषा दुबुले यांनी नियमित आढावा घेतल्याने प्रभावी काम झाले आहे. राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कक्षाचे निरीक्षक अजित दळवी, नितीन बराले, कावेरी हावगोंडी, तेजश्री पाटील, सिटीनझन पोर्टलच्या निरीक्षक विशाखा पाटील आणि या प्रणालीच्या कामकाजात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अधीक्षक शर्मा, अप्पर अधीक्षक दुबुले यांनी अभिनंदन केले आहे. 
... 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli police Top in crime and criminal investigation system