जयंतरावांचे कुजके राजकारण जिल्ह्यातून हद्दपार करणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

सांगली - जयंत पाटील यांचे कुजके राजकारण जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी मोहनराव कदम यांना आपला पाठिंबा आहे. वैयक्तिक मोहनराव कदम यांच्याबद्दल नाही; पण त्यांच्या गटाबद्दल आजही नाराजी आहेच. मात्र पक्षाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आमचे नगरसेवक त्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करतील, असे दादा गटाचे नेते विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत जाहीर केले.

सांगली- सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत विशाल पाटील यांच्या गटाचे नगरसेवक शेखर माने यांनी बंडखोरी केली आहे. विशाल पाटील समर्थक नगरसेवकांनी आणि उमेदवाराने कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी आदेश दिले होते. त्यानुसार नगरसेवकांशी चर्चा करून आज पत्रकार बैठकीत मोहनराव कदम यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, दिगंबर जाधव यांच्यासह स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज यांच्यासह दहा नगरसेवक उपस्थित होते. उमेदवार शेखर माने यांचा पाठिंबा आहे, मात्र ते तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

विशाल पाटील म्हणाले, ""प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी झालेल्या बैठकीत काहीजण सोयीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादीशी युती करतात याबद्दल नाराजी होती हे सांगितले होते. यावर चर्चा झाली. पतंगराव कदम आणि विश्‍वजित कदम यांच्यावर नाराज असल्याचेही त्यांना सांगितले आहे. अजूनही आम्ही अत्यंत नाराज आहोत.''

Web Title: sangli politics jayant patil