सांगलीत रिपरिप ; कृष्णा नदीची पाणीपातळी 23 फुटांवर स्थिर

Rain
RainSakal

सांगली : जिल्ह्यात गुरूवारी रात्रभर संततधार सुरुच आहे. आज सकाळी कृष्णा नदीची (krishna river) पाणीपातळी 23 फुटांवर स्थिर आहे. जून महिन्यातील या पहिल्याच मोठ्या पावसामुळे नागरिकांची दैना उडाली. सांगली शहरात अनेक उपनगरांत ओढे, नाले तुडुंब भरल्याचे दिसले. अनेक घरांत पाणी घुसले. सांगलीतील बंधारा तसेच नागठाणे (ता. पलूस) येथील बंधारा पाण्याखाली गेला.sangli-rain-update-water-level-of-krishna-river-is-stable-at-23-feet

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा सुरू होती. दोन-तीन दिवसांपासून पावसाची ये-जा सुरू आहे. परंतु बुधवारी मध्यरात्रीनंतर ते आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू झाली. अधून-मधून काही विश्रांती आणि पुन्हा जोरदार पाऊस असे चित्र आज दिवसभर दिसले. दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटावर पोहचली आहे.

पावसाच्या खंडानंतर काही काळ ऊन देखील पडले. परंतु दिवसभर पावसाचाच जास्त माहोल होता. सांगली-मिरजेसह जिल्ह्यातील सर्वच भागात दूरवर पावसाने हजेरी लावली. सांगलीतील बंधारा बुडाल्यामुळे सांगलीवाडीकडे बंधाऱ्यावरून जाणारा मार्ग बंद झाला. नागठाणे येथील बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे तो रस्ताही बंद करण्यात आला. पावसामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत होते. अनेक भागात पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तेथील मार्ग बंद झाल्याचे दिसले. तसेच पुलाजवळ पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४५.४ मि. मी. पावसाची नोंद झाली असून वाळवा-इस्लामपूर तालुक्यात ९७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात एक जूनपासूनपान जिल्ह्यात ‘कोसळ’धार.

आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी अशी :

मिरज ६४.१ (१६१.३), जत ३.२ (११०.३), खानापूर-विटा २६.३ (६०.४), वाळवा-इस्लामपूर ९७.१ (१५५.०), तासगाव ३०.३ (११५.०), शिराळा ४.५ (१६२.९), आटपाडी ७.२ (६४.२), कवठेमहांकाळ १६.५ (९६.७), पलूस ६७.३ (१६३.७), कडेगाव २२.३ (८८.१) धरण पाणी साठा व कंसात साठवण क्षमता (सायंकाळी ५ पर्यंत)- कोयना ३१.६७ टीएमसी (१०५.२२५ टीएमसी), धोम ५.०७ (१३.५०), कण्हेर २.४५ (१०.१०), वारणा १५.६० (३४.४०).

पुलांजवळ पाणी पातळी (सायंकाळी ५ वाजता)-

कृष्णा पूल कराड (२२.८ फूट), बहे पूल (१२.३), ताकारी पूल (३०.०६), भिलवडी पूल (६.०५), आयर्विन सांगली (१३.०६), अंकली पूल (१२.१०), म्हैसाळ बंधारा (२३.००).

कोयनेतून आज पाणी सोडणार?

दरम्यान, उद्या सकाळी ११ वाजता कोयना धरण पायथा विद्युतगृहामधून २१०० क्युसेक पाणी सोडणे विचाराधीन आहे. अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने रात्री उशिरा दिली. कोयना काठच्या लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

आपत्ती यंत्रणेला अलर्ट

पावसाचा जोर वाढताच महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अलर्ट दिला आहे. पूर पट्ट्यात आपत्कालीन यंत्रणा कार्यन्वित करण्यात येत असून संभाव्य पावसाळा लक्षात महापालिका यंत्रणा सर्व साधनासहित सज्ज झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी १९ फुटांवर पोहचली असल्याने महापालिका प्रशासनाने पूर पट्ट्यातील लोकांना अलर्ट करण्याचे काम सुरू केले आहे. पूर पट्ट्यातील मालमत्ता धारकांना पुराचे पाणी वाढताच सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याबाबत नोटिसापान आपत्ती यंत्रणेला अलर्ट बजावण्यात आल्या आहेत. तसेच ज्या नागरी वस्तीत पहिल्यांदा पाणी येते आशा ठिकाणच्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

महापालिकेची अग्निशमन यंत्रणाही संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सज्ज आहे. अग्निशमन विभागाकडून पाणी पातळीवर नजर ठेवली जात आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मंगलधाम येथील कंट्रोल रूममध्ये कृष्णा नदीच्या पातळीवर लक्ष ठेवले जात असून पावसाचा जोर कायम राहिला तर नागरिकांनी आपल्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट न पाहता त्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. त्यांनी आज काही भागात भेटी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com