स्वाभिमानीत फूट पाडणारा जन्मलेला नाही- राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

सांगली- स्वभिमानी शेतकरी संघटनेत फूट पाडण्यासारखा हातोडा अद्याप तयार झालेला नाही. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गळ्यात मफलर घातला तरी त्यांच्या छातीवर संघटनेचा बिल्ला होता, त्यामुळे भाजपने संघटनेत फूट पाडण्याचे स्वप्न पाहू नये, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. कवठेपिरान जिल्हा परिषद गटात स्वाभिमानीचा उमेदवार प्रचारार्थ दुधगाव येथील सभेत खासदार शेट्टी बोलत होते. येथील उमेदवार श्रीमती सुरेखा आडमुठे यांच्या सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले,""कृषी राज्यमंत्री खोत राज्य सरकारमधील मंत्री आहेत, कवलापूरला मुख्यमंत्री आल्याने ते सभेसाठी गेले होते. त्यांच्या गळ्यात भाजपचा मफलर होता, मात्र छातीवर संघटनेचा बिल्ला असल्याचा भाजप नेत्यांना विसर पडला. सदाभाऊ आणि मी गेल्या पंचवीस वर्षांपासून संघर्ष करीत आलो आहे. संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा काहींचा डाव असला तरी ती स्वप्ने भाजपने किंवा अन्य लोकांनी पाहू नयेत. मी आमदार झाल्यानंतर संघटना जिल्ह्यात पोहोचली आणि खासदार झाल्यानंतर संपूर्ण देशभर पोहोचली आहे. सातवा वेतन आयोग देण्यासाठी सरकारकडे एक लाख 15 हजार कोटी रुपये आहेत. उद्योगपती बुडवे आहेत. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी काही नसल्याची बाब दुर्दैवी आहे.''

Web Title: sangli: raju shetty attack on bjp