सांगली, मिरजेत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या 74 वाहनांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

वाहतूक शाखेच्या आवारात या वाहनांची गर्दी झाली होती. वाहन चालकही तेथे उपस्थित होते. त्यांनी आपली कैफियत सपोनि अतुल निकम यांच्यासमोर मांडली. शाळांनी वाहन चालकांना वाहतूक विभागाच्या तपासणीबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे ही तपासणी अचानक झाल्याचे वाहन चालकांनी सांगितले. तसेच वाहन चालकांच्या अडचणी समजून घ्याव्यात. अचानक कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

सांगली : सांगली आणि मिरज शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या 74 वाहनांवर आज उपप्रादेशिक परिवहन आणि वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम राबवून कारवाई केली. त्यांना विविध कारणांसाठी मेमो बजावण्यात आले आहेत. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यावर परिणाम झाला.

संजय घोडावत स्कूल बसला काल (मंगळवारी) अपघात झाल्यानंतर आज उप प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी स्कूल बस तपासणीची मोहीम सांगली आणि मिरज शहरात राबवली. सकाळी सहा वाजल्यापासून दुपारपर्यंत ही मोहीम सुरु होती. यामध्ये सांगलीतील 44 आणि मिरजेतील 30 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात व्हॅन, बस आणि रिक्षा यांचा समावेश आहे. परवाने नसने, जादा विद्यार्थी वाहतूक करणे, चालकाचा परवाना नसणे, विमा नसणे आदी विविध कारणांसाठी वाहनधारकांना मेमो बजावण्यात आले आहेत. त्याबाबत त्यांना तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल निकम यांनी दिली.

निकम म्हणाले, दोन्ही विभागांनी संयुक्त मोहीम राबवली. सकाळी वाहन तपासणी करताना विद्यार्थ्यांना शाळेत सोडून वाहने ताब्यात घेतली. मात्र कारवाई केलेली वाहनांच्या विद्यार्थ्यांना परत नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या. ही तपासणी कालच्या अपघातानंतर केलेली नाही. फेब्रुवारी महिन्यांपासून शाळांना त्यांच्याकडील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संपुर्ण माहिती मागितली होती. सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या नियामुसानरच ही कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे.'

दरम्यान, वाहतूक शाखेच्या आवारात या वाहनांची गर्दी झाली होती. वाहन चालकही तेथे उपस्थित होते. त्यांनी आपली कैफियत सपोनि अतुल निकम यांच्यासमोर मांडली. शाळांनी वाहन चालकांना वाहतूक विभागाच्या तपासणीबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे ही तपासणी अचानक झाल्याचे वाहन चालकांनी सांगितले. तसेच वाहन चालकांच्या अडचणी समजून घ्याव्यात. अचानक कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

Web Title: Sangli RTO action against school bus and van