उद्याचे अद्‌भुत जग अनुभवण्यासाठी जरूर या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

सांगली - दैनिक ‘सकाळ’च्या सांगली कार्यालयाचा ३३ वा वर्धापन दिन मंगळवारी (ता. २८) साजरा होत आहे. यानिमित्ताने तंत्रज्ञानाने प्रेरित झालेल्या युवा पिढीला पुस्तकांकडे आकर्षित करणारे युवा लेखक अतुल कहाते यांचे व्याख्यान होणार आहे. विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान व स्नेहमेळावा होईल. 

उद्याच्या जगाचा उल्लेख टेक्‍नियम असा करण्यात येतो. हे जग कसे असेल याचे अद्‌भुत चित्रच श्री. कहाते यानिमित्ताने उभे करणार आहेत. या व्याख्यानासाठी सर्व वाचकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकाळ माध्यम समूहातर्फे करण्यात येत आहे.

श्री. कहाते यांचा मराठीत विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे. एमबीए असलेल्या कहातेंचा लेखनातील प्रवास थक्‍क करणारा आहे. आतापर्यंत त्यांची मराठीत ५५, तर इंग्रजीत २९ इतकी पुस्तके प्रकाशित आहेत. संगणक विषयातील त्यांची काही पुस्तके देशात व परदेशामधील ५० विद्यापीठांत अभ्यासक्रमासाठी निवडली गेली आहेत. त्यांचा चिनी भाषेतही अनुवाद झाला असून ‘क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्‍युरिटी’ या पुस्तकाने तर खपाचा विक्रमही नोंदविला आहे. संगणक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी नेटवर्क सिक्‍युरिटी, वेब टेक्‍नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टिम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन्स, सी प्लस प्लस अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. 

‘सकाळ’सह अनेक दैनिकांचे ते नियमित स्तंभलेखक आहेत. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये स्कोअरर आणि आकडेवारीतज्ज्ञ म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे नवा विचार आणि ‘सकाळ’सोबत स्नेहमेळावा अनुभवण्यासाठी जरूर या. आपली उपस्थिती याच शुभेच्छा आहेत. कृपया पुष्पगुच्छ आणू नयेत.

Web Title: Sangli Sakal 33 anniversary