आमचं लीड १२७ च्या खाली नाही - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

सांगली - सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय ठरलेला आहे.  राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांचा विजय किमान १२७ मतांच्या फरकांनी असेल, असे मत राष्ट्रवादीचे नेते  जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यांची पक्षावर निष्ठा असल्याने नगरसेवक कुठेही गेले, कोणाला भेटले तरी त्यांच्यावर माझा पूर्ण विश्‍वास असल्याचेही त्यांनी सांगितले.  

 राष्ट्रवादीचे उमेदवार गोरे यांनी सांगली शहरासह जिल्ह्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. दुपारी चार वाजता सांगली महापालिकेतील नगरसेवकांची राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक झाली. आमदार पाटील व उमेदवार गोरे यांनी सदस्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. श्री. गोरे यांनी यापूर्वी इस्लामपूर, आष्टा येथील नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. 

आमदार पाटील म्हणाले,‘‘सांगली व सातारा विधानपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीवर मी लक्ष केंद्रित  केले आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांच्या समर्थक सदस्यांशिवाय केवळ राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या काँग्रेसपेक्षा १२७ ने जादा आहे. शिवाय काही काँग्रेसचे सदस्यही आमच्या संपर्कात आहेत.’’ राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात तर दोन नगरसेवक विशाल पाटील यांच्या संपर्कात आहेत याबाबत म्हणाले,‘‘कोणी कोणाच्याही संपर्कात असले तरी त्यांचे अन्‌ माझे वैयक्तिक संबंध आहेत. ते कुठेही जाणार नाहीत.’’ धनशक्तीबाबत विचारले असता ते म्हणाले, उमेदवार गरीब-श्रीमंत यापेक्षा राष्ट्रवादीची विचारधारा महत्त्वाची ठरणार आहे.’’

जयंतराव म्हणाले

  • नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगली संधी
  • तासगाव, इस्लामपुरात भक्कम स्थिती
  • आष्टा, कवठेमहांकाळला आघाडी करून निवडणूक
  • पलूस, कडेगाव, खानापूरला चांगली लढत देऊ
  • विटा येथे आघाडीबाबत बाबासाहेब मुळीक यांना अधिकार 
  • पलूस, कडेगावलाही चांगली लढत देणार 
Web Title: sangli-satara vidhan parishad election