सांगली विभागाला ५३.५१ कोटींचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सांगली - राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागाने नवनवे प्रयोग करून प्रवाशाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदा उन्हाळी हंगामात ५३.५१ कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवर्षी उत्पन्न ४६.९६ कोटी होते. यंदा उन्हाळी हंगामासाठी गाड्या सोडण्यात येत आहे. प्रवाशांनी जास्तीत जास्त या गाड्यांचा लाभ घ्यावा, जेणेकरून या गाड्या नेहमी सुरू ठेवता येतील, असे आवाहन एस. टी. चे सांगली विभागाचे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.

दरम्यान, अवैध प्रवासी वाहतुकीला चाप लावण्यात पोलिस, आरटीओ आणि रा. प. पर्यवेक्षकांच्या संयुक्त पथकास यश येत असून अवैध वाहनांवर कारवाई करून आठ लाख ऐंशी हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती त्यांनी दिली. सांगली एस. टी. च्या वतीने सुरू केलेल्या विविध योजनांविषयी महिती देताना चव्हाण म्हणाले, ‘‘ऑनलाइनसह विभागातील प्रत्येक बसस्थानकावर आरक्षण सुविधा उपलब्ध करण्यात आली. स्वच्छ थंड पाण्याची सोय, मार्गनिहाय फलाटाची व बसण्याची सोय, १० स्थानके व १५ कंट्रोल पॉईंटवर विद्यार्थी पासची सोय, अंध, अपंग, विद्यार्थी आदींसाठी सवलतीच्या २२ योजना, आवडेल तिथे प्रवास, सवलतीचे पास, रोजचा प्रवास करणाऱ्यांसाठी वार्षिक सवलत कार्ड, अपघातातील जखमी व मृत व्यक्तींच्या नातेवाइकाना चालू वर्षी एक कोटी भरपाई देण्यात आली आहे.

एप्रिल, मे व जून या गर्दी हंगामात लांबपल्ला, मध्यम लांब पल्ला मार्गावर एकूण दैनंदिन ३१००० किमीची वाढ करण्यात आली आहे. यादृष्टिने आगारनिहाय नियोजन करण्यात आले आहे. विभागातील सर्व अधिकारी, पर्यवेक्षक व सर्व कर्मचारी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. 

एस.टी.च्या विनावाहक सेवा

सांगली- पुणे २८ फेऱ्या, सांगली-कोल्हापूर ३६ फेऱ्या, सांगली- इचलकरंजी ३६ फेऱ्या, इस्लामपूर - कोल्हापूर ३६ फेऱ्या. 
याच सोबत सांगली-पुणे व्हॉल्वो बसच्या तीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. 

शटल सेवा (१५ मिनिटे ते तासाचा फरक)
  
सांगली- कोल्हापूर, सांगली-कऱ्हाड, सांगली- इचलकंरजी, सांगली- वाळवा, मिरज-कोल्हापूर, तासगाव-मिरज, कवठेमहांकाळ-तासगाव, जत-सांगली, आटपाडी-सांगली, पलूस-सांगली, इस्लामपूर- कोल्हापूर, इस्लामपूर-बांबवडे, इस्लामपूर-शेडगेवाडी.

Web Title: Sangli section 53.51 crore target