सांगली गारठली ; पारा @ 18 अंश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

सांगली - आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात थंडीची लाट निर्माण झाली आहे. पहाटे व रात्री धुक्‍यासह हवेत गारवा आहे. आठवड्यात मोठ्या प्रमाणावर थंडीला सुरवात झाली आहे. रविवारी रात्री पारा 18 अंशावर घसरला. येत्या तीन दिवसांत गारठ्याची लाट वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या संकेतस्थळावर वर्तवली आहे. 

या महिन्याच्या सुरवातीपासून शहरात थंडी पडू लगली आहे. नोव्हेंबर प्रारंभीच किमान तापमानाचा पारा सलग सहा दिवस सरासरीपेक्षा दोन-तीन अंश सेल्सिअसने कमी राहिला. दिवसाचे तापमानही सरासरी इतके राहिले. तसेच उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत आहे. तेथून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहताहेत. राज्यातील किमान तापमानात पुढील काही अंश घट झाली. 
शहरात पुढील आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पारा 15 अंशापर्यंत घसरला. 

थंडीमुळे बाजारपेठेत स्वेटरसह ऊबदार कपड्यांच्या खरेदीला सुरवात झाली. ग्रामीण भागात थंडी व धुक्‍यामुळे दैनंदिन वेळापत्रक कोलमडले आहे. थंडीही वाढत असल्याने स्वेटर, जॅकेट, कानटोप्या, स्कार्प, मफलर बांधून ये-जा सुरू आहे. शहरात अनेक ठिकाणी ऊबदार कपड्यांची दुकाने सजलीत. दुकानांव्यतिरिक्त रात्री शहरात चौकाचौकात बसून ऊबदार कपड्यांसह टोप्यांची विक्री सुरू आहे. 

Web Title: sangli temperature 18 degrees