सांगली : चोरट्यांचा शहर परिसरात धुमाकूळ

शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
 Crime News
Crime Newsesakal

सांगली : शहरात दुचाकीचोरांसह मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर मोटार आणि ट्रक चोरीचे गुन्हेही नुकतेच घडले आहेत. त्याचबरोबर बंद घरे फोडण्याचे, चोरीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.

शहर परिसरातून दुचाकी, सायकल चोरीचे अनेक गुन्हे गेल्या काही महिन्यांपासून घडले आहेत. तसेच घरातून सहजपणे मोबाईल लांबवण्याचे प्रकार काही थांबले नाहीत. दुचाकी आणि मोबाईल चोरट्यांना कसे पकडायचे, असा प्रश्‍न पोलिसांसमोर पडला आहे. पोलिस दप्तरी दुचाकी व मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे प्रलंबित दिसत आहेत. कोणताही मागमूस न ठेवता चोरटे चोऱ्या करून गायब होऊ लागलेत, असे चित्र आहे. शहरातील तीन पोलिस ठाण्यांमध्ये

रोज मोबाईल आणि दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तक्रारदार येत आहेत.

दुचाकी, मोबाईल चोरीबरोबर मोटार आणि ट्रक चोरीचेही गुन्हे नुकतेच घडले आहेत. त्याचबरोबर बंद घरे फोडण्याचे आणि चोऱ्यांचे प्रकारही वाढलेत. चेन स्नॅचिंगचे प्रकारही अधून-मधून घडत आहेत. त्यामुळे शहर पोलिस

ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे. शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. खासगी ठिकाणचे कॅमेरेही कार्यरत आहेत, तरीही चोरी करून चोरटे गायब होत आहेत. पोलिसांबरोबर नागरिकांनी

देखील दक्ष होऊन सावधानता बाळगण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com