"सांगली अर्बनचे'ची रक्कम वैयक्तिक नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

सांगली - तुळजापूर येथे ताब्यात घेतलेल्या सांगली अर्बन बॅंकेच्या सहा कोटी रुपयांमध्ये शंभर रुपयांच्या 60 हजार नोटा होत्या. हे 60 लाख रुपये ग्राहकांच्या सोयीसाठी आणि एटीएममध्ये भरणा करण्यासाठी येत होते. ही रक्कम वैयक्तिक नव्हती. त्यामुळे ग्राहकांनी गैरसमज करून घेऊ नये. तसेच यामध्ये कोणी राजकारणही करू नये. बॅंकेचे अधिकारी उस्मानाबाद येथे गेले आहेत. बुधवारपर्यंत (ता. 16) रक्‍कम सांगलीत येईल अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले,""सांगली अर्बन बॅंक ही शेड्युल्ड सहकारी बॅंक आहे. 35 शाखांपैकी मराठवाड्यात सहा जिल्ह्यांत नऊ शाखा आहेत. रिझर्व्ह बॅंकेने पाचशे व हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर 10 तारखेपासून मोठ्या प्रमाणात या नोटा बॅंकेकडे जमा होत आहेत. मराठवाड्यातील परभणी व माजलगाव शाखेतील मोठी रक्कम "करन्सी चेस्ट' असलेल्या राष्ट्रीईकृत व खासगी बॅंकांनी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे दोन्ही शाखांतील सहा कोटी रुपये 14 रोजी सांगलीकडे येत होते. बॅंकेच्या वाहनातून रोकड आणली जात असताना तुळजापूर येथे सहा कोटी रुपये ताब्यात घेतले. ही रक्कम बॅंकेची मालमत्ता आहे. त्याचा तपशील वाहनातील कर्मचाऱ्यांनी दाखवला आहे. बॅंकेतील रजिस्टरमध्येही त्याच्या नोंदी आहेत. गाडीसोबत शस्त्रधारी गार्ड नसल्यामुळे ती थांबवली गेली. बॅंकेचा सहा कोटी रुपयांचा "इन ट्रांझिट' विमादेखील आहे. प्राप्तिकर विभागालादेखील कळवले आहे. बुधवारपर्यंत रक्कम ताब्यात मिळेल. ही रक्कम वैयक्तिक नाही. त्यामुळे गैरसमज पसरवू नये. त्याचे राजकारणही करू नये.'' 

अफवा आणि राजकारण 

तुळजापूरला ताब्यात घेतलेल्या नोटा या बॅंकेच्या की आमदार सुधीर गाडगीळ यांच्या या चर्चेवर पत्रकारांनी विचारले असता, गणेश गाडगीळ म्हणाले,""ही रक्कम बॅंकेचीच होती. वैयक्तिक कोणाचीही रक्कम नव्हती. त्यामुळे याबाबत उलटसुलट अफवा पसरविल्या जात आहेत. बॅंकेच्या अर्थकारणाशी संबंध असल्याने यावर कोणीही राजकारण करू नये आणि अफवाही पसरू नयेत,'' असे ते म्हणाले.

Web Title: Sangli Urban No amount of personal