सांगली अर्बन, शिक्षक बॅंकेसह सोळा संस्थांची मतदार यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Urban

सांगली अर्बन, शिक्षक बॅंकेसह सोळा संस्थांची मतदार यादी जाहीर

सांगली: सांगली अर्बन बॅंक, प्राथमिक शिक्षक बॅंकेसह सोळा सहकारी संस्थांची अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध झाली. यामध्ये पाच सहकारी बॅंका, सहा नागरी सहकारी पतसंस्था, डॉ. पतंगराव खरेदी विक्री संघासह चार सोसायट्यांचा समावेश आहे. या संस्थांच्या निवडणुकीचे पडघम लवकरच सुरू होतील, असे संकेत आहेत.

गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या सांगली अर्बन बॅंक व प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेची एकदा निवडणूक जाहीर झाली आहे. सांगली जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालयाने आज अंतिम मतदार यदी प्रसिद्ध केली. यानंतर दहा ते पंधरा दिवसांत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता लागू होईल. त्या दिवसापासून ३५ दिवसांत प्रत्यक्षात मतदान होईल. सर्वसाधारण जूनअखेर तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक अपेक्षित आहे. सांगली अर्बन बॅंकेचे ६० हजार तर शिक्षक बॅंकेची सभासद संख्या सव्वापाच हजार आहे.

निवडणुका होणाऱ्या बॅंकांमध्ये सांगली अर्बन बॅंक, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक, दि विटा मर्चंटस्, तासगाव अर्बन बॅंक, एम. डी. पवार पीपल्स बॅंक (इस्लामपूर) यांचा समावेश आहे. सहा नागरी पतसंस्थामध्ये लट्ठे शिक्षण सेवकांचीपान ९ वर

सहकारी पतसंस्था (सांगली), पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था (सांगली), अहिल्यादेवी होळकर सहकारी पतसंस्था (पेड), सांगली जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्था (सांगली), वग्याणी लोकमान्य सहकारी पतसंस्था (आष्टा), श्री दत्त सहकारी पतसंस्था (इस्लामपूर) यांचा समावेश आहे. पलूस येथील डॉ. पतंगराव कदम शेतकरी खरेदी विक्री संघ, सांगली जिल्हा पोलिस सोसायटी, सिम्बायोसिस फार्मास्युटिकल्स (सांगली) तसेच जत तालुक्यातील दरिकोन्नर सोसायटी व व्हसपेठ या दोन सोसायट्यांचाही समावेश आहे.

Web Title: Sangli Urban Shikshak Bank Voter List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top