सांगली ब्रेकिंग; जिल्हा परिषदेतील लिपीक लाचलुचपत जाळ्यात

२५ हजारांची घेतली लाच; देयक रक्कम देण्यासाठी मागणी
सांगली ब्रेकिंग; जिल्हा परिषदेतील लिपीक लाचलुचपत जाळ्यात

सांगली : येथील जिल्हा परिषदेतील (zilha prishad sangli) बांधकाम विभागातील लिपीकास (clerk) पंचवीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. अरूण योगीनाथ कुशीरे (वय ५७, रा. उरूणवाडी, इस्लामपूर) असे त्याचे नाव (fruad and arrested police) आहे. तक्रारदार यांच्या कामाची देयक रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. (sangli zilha parishad clerk bribery case arrested police)

अधिक माहिती अशी, की अरूण कुशीरे हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात लिपीक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांनी केलेल्या कामाची देयक रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी कुशीरे याने ३५ हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (anti corruption) तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर कुशीरे याने २५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सकाळी जिल्हा परिषदेत सापळा रचण्यात आला.

सांगली ब्रेकिंग; जिल्हा परिषदेतील लिपीक लाचलुचपत जाळ्यात
Video : ...तर होणार नाही म्युकोरमायकोसिस

तक्रारदार यांनी पंचवीस हजार रूपयांची लाच देताना कुशीरे यास रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा परिषदेतील कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. लाचलुचपतचे अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरूदत्त मोरे, अविनाश सागर, भास्कर भोरे, संजय कलकुटगी, सलीम मकानदार, राधीका माने यांचा कारवाईत सहभाग होता.

दोन महिन्यातील तिसरी कारवाई

गेल्या दोन महिन्यात टाळेबंदी (lockdown) असतानाही लाचखोरीचे (bribeless) प्रमाण वाढलेलेच आहे. तीन मोठ्या कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्या आहे. राज्य उत्पादन शुल्कचा निरीक्षक, कवठेमहांकाळ येथील तलाठी आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेतील लिपीकावर ही कारवाई झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com