सांगली जि.प.उपाध्यक्ष म्हणाले, 'मी झेडपीत पुन्हा येईन म्हणणार नाही'.

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव व जि.प.उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी आज सर्वसाधारण सभेत तुफान फटकेबाजी केली.

सांगली -  जिल्हा परिषदेत राजकीय समीकरणे मोठी रंजक होतील, असे चित्र आहे. अशावेळी सत्तेचा पासंग हाती असलेल्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव व जि.प.उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी आज सर्वसाधारण सभेत तुफान फटकेबाजी केली. आमच्याशिवाय कुणाचेच सत्तेचे गणित जमत नाही, हे खरे आहे, मात्र तरीही 'मी पुन्हा येईन' अस म्हणणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

आमदार बाबर गटाची भूमिका निर्णायक असेल

सध्या जिल्हा परिषदेत भाजपची शिवसेनेसोब युतीची सत्ता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधात आहे. आता राज्यात जसे आहे तसे नवे समीकरण झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना सत्तेवर येईल. त्यात आमदार बाबर गटाची भूमिकाच निर्णायक असेल. सुहास बाबर यांना उपाध्यक्षपद मिळणार आहे. त्याबाबत सर्व सदस्यांनी सभेत टोलेबाजी केल्यानंतर सुहास यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, आता नवी जुळणी करणे खरेच सोपे नाही. ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या सोबत जावे लागेल का ? हा विषय आहेच.वेळ उत्तर देईल. मी त्यावर बोलणार नाही आणि मी पुन्हा येईन, असेही म्हणणार नाही.

हेही वाचा - कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षनिवडीसाठी खलबते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli ZP vice president said, 'I will not say that I will come back to ZP'.