यंदाचा "सांगलीभूषण' डॉ. एन. डी. पाटील यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सांगली - विश्‍वजागृती मंडळातर्फे देण्यात येणारा सांगलीभूषण पुरस्कार यंदा रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री डॉ. एन. डी. पाटील यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती अरुण दांडेकर यांनी दिली.

सांगली - विश्‍वजागृती मंडळातर्फे देण्यात येणारा सांगलीभूषण पुरस्कार यंदा रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री डॉ. एन. डी. पाटील यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती अरुण दांडेकर यांनी दिली.

दांडेकर म्हणाले, 'विश्‍वजागृती मंडळातर्फे 1996 पासून पुरस्कार देण्यात येतो. यंदा डॉ. एन. डी. पाटील यांना देण्यात येणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे त्यांच्यावर लहान वयातच संस्कार झाले. शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोचली पाहिजे, या कर्मवीरांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन डॉ. पाटील यांनी कामाला सुरवात केली. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम केले. त्या वेळी कमवा आणि शिका योजनेचे प्रमुख व रेक्‍टर म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर इस्लामपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून जबाबदारी पार पाडली. पुढील काळात शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य, सिनेट सदस्य, कार्यकारणी सदस्य, सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नंतर कार्यवाह, राज्य प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य अशी शैक्षणिक क्षेत्रातील प्रचंड कामगिरी त्यांची आहे.'

Web Title: sanglibhushan award to dr. n. d. patil