सांगोला, स्वामी समर्थ, गोविंदपर्व कारखान्यांवर गुन्हे दाखल करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

सोलापूर - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेची परस्पर विक्री करून त्याचे पैसे बॅंकेत न भरल्याने सांगोला सहकारी साखर कारखाना, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ सहकारी कारखाना व करमाळ्यातील गोविंदपर्व ॲग्रो प्रॉडक्‍ट्‌सवर गुन्हे दाखल करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी विनंती विभागीय सहनिबंधकांनी पोलिस अधीक्षकांना केली आहे. 

या कारखान्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून न घेतल्याचे बॅंकेच्यावतीने सहनिबंधक कार्यालयाला कळविण्यात आले होते. अद्यापपर्यंत या कारखान्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला नाही व त्यांच्यावर कारवाईही झालेली नसल्याचे सहनिबंधकांनी या पत्रात म्हटले आहे. स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्याबाबतीत अक्कलकोट पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी हजर राहून जबाब दिला आहे; परंतु पोलिस ठाण्याकडून दखल घेतली जात नाही. संबंधित पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्याची विनंतीही विभागीय सहनिबंधकांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

Web Title: Sango, enter the Swami, govindaparva industries Crime