कडेगावमधून विश्वजीत कदम बिनविरोध; भाजपची माघार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

आज अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील चुरस संपुष्ठात आली आहे. माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत आहे. कै. कदम यांचे चिरंजीव विश्‍वजीत यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. आता या निवडणुक रिंगणात कदम यांच्याशिवाय उमेदवार आहेत. 

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज माघार घेतली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटी शर्थीशिवाय माघार घेतल्याचे आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

आज अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील चुरस संपुष्ठात आली आहे. माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत आहे. कै. कदम यांचे चिरंजीव विश्‍वजीत यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. आता या निवडणुक रिंगणात कदम यांच्याशिवाय उमेदवार आहेत. 

येत्या 28 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान आहे. या निवडणुकीत अन्य चार जणांचे अर्ज असून त्याबाबतचे चित्र काही मिनिटांत स्पष्ट होईल. 

प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेल्या विश्‍वजीत यांच्यासाठी ही निवडणूक पुढील राजकीय वाटचालीचा महत्वाचा टप्पा असेल. प्रारंभी ही निवडणूक बिनविरोध होईल असेच वातारवण होते. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनपेक्षितपणे संग्रामसिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक चुरशीचे होईल असे संकेत दिले. अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आले होते. भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे आणि विलासराव जगताप, देशमुख यांचे पक्षांतर्गत विरोधक अशी प्रतिमा निर्माण झालेले खासदार संजय पाटील अशी मात्तबर मंडळी संग्रामसिंह यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. संग्रामसिंह यांचे चुलतभाऊ व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचाही डमी अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज छाननी अवैध ठरला. कारण देशमुख यांनी उमेदवारी भाजपची असे अर्जात नमूद केले असले तरी त्याला एबी फॉर्म मात्र जोडलेला नव्हता. त्यामुळे विश्‍वजीत विरुध्द संग्रामसिंह असा सामना निश्‍चित झाला होता. मात्र अचानकपणे संग्रामसिंह यांनी माघार घेत विश्‍वजीत यांचा मार्ग सूकर केला आहे. भाजपने उमेदवार उभा केल्यानंतरही या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेत विश्‍वजीत यांना पाठिंबा दिला होता. खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचा पाठिंबा देणारे पत्र प्रसिध्दीस दिले होते. 

Web Title: Sangramsingh deshmukh withdraw nominination in kadegaon bypoll Vishwajeet Kadam unopposed