कडेगाव-पलूसमध्ये पृथ्वीराज ऐवजी सग्रांमसिंहना उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सांगली : कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणुकीत आज भाजपने ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिल्याने सर्वांनाच धक्‍का दिला आहे. मुळात ही निवडणूक बिनविरोध होईल, अशा शक्‍यता वर्तविल्या जात असतानाच भाजपने काल जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र आज सकाळी या निर्णयात बदल केला आहे. 

काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे येथे पोट निवडणूक होत असून, राष्ट्रवादीने येथे उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत केवळ औपचारिकता बाकी असल्याचे ठोकताळे मांडले जात असतानाच भाजपने येथे संग्रामसिंह देशमुखांना उतरविल्याने आता या निवडणुकीत पुन्हा रंग भरणार आहे. 

संग्रामसिंह राजकारणात एकदम फ्रेश चेहरा आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बॅंकेवर उपाध्यक्ष अशा अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सध्या ते पार पाडत आहेत. माजी आमदार संपतराव देशमुख यांचे ते चिरंजीव तर पृथ्वीराज यांचे चुलत बंधू आहेत. टेंभू योजेनेचे जनक असलेल्या संपतरावांचा त्यांना असलेला वारसा ही जमेची बाजू आहे. याशिवाय गोपूज हा त्यांनी निर्माण केलेला खासगी साखर कारखाना कौतुकास्पद ठरला आहे. राजकारणात स्वत:ची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. 

काँग्रेसचे उमेदवार विश्‍वजीत यांना ते चांगली टक्‍कर देतील अशी चर्चा आहे. भाजपने अनपेक्षीतपणे संग्रामसिंह यांचे नाव पुढे आणल्याने जिल्ह्यातील भाजपची सगळी समिकरणे नव्याने मांडली जातील अशी शक्‍यता आहे. त्यात लोकसभेच्या उमेदवारीपासून खासदार संजय पाटील यांच्या राज्यात राहण्याच्या सूप्त इच्छेपर्यंत अनेक गोष्टींना वाव मिळण्याचीही शक्‍यता निर्माण झाली आहे. 

Web Title: sangramsinh gets candidature instead of Pratitriraj in Kathgaon-Palus