संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा उत्साहात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथे संत-महंतांच्या हस्ते आदर्श माता व समाजभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. श्री ज्ञानेश्वर मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 724 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नेवासे : संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथे संत-महंतांच्या हस्ते आदर्श माता व समाजभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. श्री ज्ञानेश्वर मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 724 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगरचनेवर आधारित "नमो ज्ञानेश्वरा' या कार्यक्रमाचे आयोजन समर्पण कृषी क्रांती व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान यांच्यातर्फे करण्यात आले. 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पुणे येथील उद्योजक रवींद्र मुनोत यांच्यातर्फे त्यांच्या मातोश्री स्वर्गीय रमाबाई पन्नालाल मुनोत यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार निवृत्त मुख्याध्यापिका शरदिनी मधुकर देशपांडे यांना देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अनिल पेचे, किशोर कुरकुटे व प्रदीप औटी यांना समर्पण कृषी क्रांतीतर्फे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

उद्धव महाराज मंडलिक, शिवाजी महाराज देशमुख, सुनील महाराज गिरी, नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, प्रा. डॉ. जयश्री गडाख यांच्या हस्ते संस्थानचे अध्यक्ष ऍड. माधव दरंदले, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, अंबादास इरले, दौलत देशमुख उपस्थित होते. 
समर्पण संजय सुकळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. करणसिंह घुले यांनी स्वागत केले. या वेळी महाप्रसादाचे आयोजनही "समर्पण'तर्फे करण्यात आले होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjeevan Samadhi Ceremony