आपल्यावरील संक्रांत टळावी म्हणून कैद्यांचा उपवास

sabudana-khichdi
sabudana-khichdi

श्रीगोंदे (नगर)- गुन्हेगार हा जन्मजात नसतो याची प्रचिती आज श्रीगोंदयात आली. येथील कारागृहात असलेल्या आरोपींनी चक्क आज उपवास धरला. या उपवासाचा उद्देश काय होता हे समजले नाही पण त्यांच्यावरील आरोपांची संक्रात टळावी यासाठी त्यांनी उपवास केल्याची खुमासदार चर्चा मात्र सुरू होती.

श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील कारागृहात आज खमंग खिचडीचा बेत होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेजारच्या खाणावळीतून आलेल्या खिचडीवर कारागृहात असणारे सगळे म्हणजे ३२ कैदी ताव मारत होते. एरव्ही या कैद्यांना नेहमीचे भाजी भाकरीचे जेवण असते आज त्यांना उपवसाची खिचडी आल्याने तेथे असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही विशेष वाटले. त्यांनाही नेमका प्रकार समजत नव्हता. त्यामुळे त्यांनी कैदी व खाणावळीतून आलेल्या कामगारांना विचारणा केली. आज भाजी भाकरी नको तर खिचडीच ऑर्डर केल्याचे सांगण्यात आल्यावर त्या पोलिसांचे कुतूहल अजून वाढले. त्यावेळी त्यांना समजले की काही कैद्यांना उपवास होता पण आज तेथील एका महिला कैद्यासह सगळ्यानीच उपवास धरल्याचे सांगितले.

खिचडीचा बेत हा उपवास म्हणून होता की चेंज म्हणून हे निश्चित समजले नाही. मात्र उद्याच्या संक्रात सणाच्या पार्श्वभूमीवर कोठडीतून लवकर बाहेर पडण्यासाठी देवाला साकडे म्हणून उपवास होता अशी चर्चा मात्र पोलिसांमध्ये रंगली होती. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना या खिचडी बेताविषयी खात्री केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com