सांताक्‍लॉजची ‘गुडी बॅग’ही आता ऑनलाइन...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

कोल्हापूर - नाताळचा आनंद द्विगुणीत करताना बालमित्रांसाठी विविध भेटवस्तूंची पर्वणी ठरणारी सांताक्‍लॉजची ‘गुडी बॅग’ही आता ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. त्याशिवाय ख्रिसमस ट्री, विविधरंगी ग्रीटिंग्ज कार्डस्‌, फुलांच्या व्हरायटी, ख्रिसमस स्पेशल चॉकलेट बॉक्‍सेस, म्युझिकल सांता, विविध ॲनिमेटेड लॅम्प्सनाही ऑनलाइन मागणी वाढली आहे. लाल रंगाच्या थीमनुसार यंदा ऑनलाइन मार्केटमध्ये गिफ्ट हॅम्पर्स उपलब्ध असून, ऑनलाइन ऑर्डर नोंदवणाऱ्यांसाठी तीस टक्‍क्‍यांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या आहेत. 

सांताक्‍लॉज टॉय विथ लाइट, चॉकलेट विथ रोझ बॉक्‍स, मोबाइल स्टॅंड, विविधरंगी आकाशदिवे, एलइडी बलून्स, कलरफुल लॅंप, कॅन्डल्स, सांताक्‍लॉजचे ड्रेस, की-चेन्स, फोटो-फ्रेम्स, वॉल हॅंगिंगसह विविध इलेक्‍ट्रॉनिक्‍स गिफ्टस्‌ही ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याशिवाय अठरा ते वीस विविध फ्लेवर्समध्ये चॉकलेट बॉक्‍स उपलब्ध आहेत. यंदाच्या आनंदोत्सवात गिटार वाजविणारा सांताक्‍लॉज अधिक लोकप्रिय होऊ लागला आहेत. परिवारातील सदस्यांसह मित्र-मैत्रणींना भेट देण्यासाठी टी-शर्टस्‌पासून नेकलेसपर्यंत आणि हॅंडमेड पर्सेसपासून घड्याळांपर्यंच्या विविध व्हरायटीही ऑनलाइन उपलब्ध आहेत. 

हॉटेल्सचीही तयारी
खास नाताळसाठी येथील विविध हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी केक्स्‌च्या रेसिपीज अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

वाइन आणि अल्कोहोलचा वापर केलेले केक आणि विविध फ्रूट ज्युसेसचा वापर केलेल्या केक्‍सच्या त्यामध्ये समावेश आहे. युरोप, अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांत अशा पद्धतीचे केक तयार करण्याची परंपरा आहे. आता अशा पद्धतीचे केक कोल्हापुरातही मिळू लागले आहेत आणि त्यासाठी विविध हॉटेलनी नाताळसाठी अशा स्पेशल केक्‍सची पर्वणी यंदाही दिली असून नाताळचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध पॅकेजिसही जाहीर केली आहेत. 

वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये कार्यक्रमांना प्रारंभ
शेंडा पार्क येथील कुष्ठरुग्णांना कपडे वाटप करून न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. 
२३ डिसेंबरला सावित्रीबाई फुले व आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये सकाळी अकरा वाजता आणि दुपारी साडेतीन वाजता अंधशाळा व चेतना विकास मंदिर येथे कार्यक्रम होतील. २५ डिसेंबरला ख्रिस्त जन्मदिनाची विशेष उपासना होणार असून, सकाळी आठ ते साडेनऊ वेळेत इंग्रजी, पावणेदहा ते अकरा या वेळेत पहिली मराठी, सव्वाअकरा ते साडेबारा या वेळेत दुसरी मराठी, दुपारी साडेबारा ते पावणेदोन या वेळेत तिसरी मराठी उपासना होईल. महापालिकेजवळील शहर उपासना मंदिरात सायंकाळी सहा वाजता मराठी उपासना होईल, अशी माहिती जे. ए. हिरवे, डी. बी. समुद्रे यांनी दिली. 

चलन तुटवड्यामुळे...
सध्याच्या चलन तुटवड्यामुळे ऑनलाइन मागणी वाढली असून, आयत्यावेळची धांदल कमी करण्यासाठी दहा दिवसांपूर्वीच ऑर्डर्स दिल्या जात आहेत. त्यातही तीस टक्‍क्‍यांपर्यंतच्या ऑफर्स असल्याने येत्या आठवड्यात ही उलाढाल आणखी वाढणार आहे.

Web Title: santa clause goody bag online