आटपाडकरच्या पलायनप्रकरणी तिघा जणांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

एक नजर

  • कवठेमहांकाळ तालुक्‍यातील पिंपळवाडी येथील अमर ऊर्फ संतोष जयराम आटपाडकर याच्या पलायनप्रकरणी तिघांना अटक, एकजण पसार. 
  • विशाल बसाप्पा कोलार (वय २१), सिध्दार्थ अनिल वाघमारे (२२), प्रज्वल अनिल माने (१९ सर्व रा. कवठेमहांकाळ) यांना अटक
  • तिघांना न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी
  • तेजस शामराव माने (रा. कवठेमहांकाळ), अमर आटपाडकर याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना

कवठेमहांकाळ - तालुक्‍यातील पिंपळवाडी येथील अमर ऊर्फ संतोष जयराम आटपाडकर याच्या पलायनप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, एकजण पसार आहे.

विशाल बसाप्पा कोलार (वय २१), सिध्दार्थ अनिल वाघमारे (२२), प्रज्वल अनिल माने (१९ सर्व रा. कवठेमहांकाळ) यांना अटक केली आहे. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तेजस शामराव माने (रा. कवठेमहांकाळ) हा पसार आहे. अमर आटपाडकर याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. 

शासकीय वैद्यकीय दवाखान्यासमोर एका व्यापाऱ्यास अडवून त्याची गाडी घेऊन मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आटपाडकर यास इस्लामपूर येथे सापळा रचून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला ताब्यात घेत शुक्रवारी (ता. ५) साडेसहाच्या सुमारास वैद्यकीय चाचणीकरिता शासकीय दवाखाना कवठेमहांकाळ येथून तपासणी पूर्ण करून घेऊन जात असताना हाताला हिसडा मारून तो बेडीसह पळून गेला होता.

आटपाडकर यास पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता पळवून घालवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अप्पासाहेब कोळी, सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील करीत आहेत.

Web Title: Santosh Atpadkar escapade case three arrested