राईनपाडा हत्याकांडाच्या निषेधार्थ संवेदना सभा

चंद्रकांत देवकते
बुधवार, 4 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रात सध्या  वेगवेगळ्या अफवांचे प्रचंड पिक येत असुन अशा अफवांमुळेच अनोळखी व्यक्तींविषयी समाजात अतिरिक्त भिती निर्माण होत आहे. पोटासाठी भ्रमंती करणाऱ्या लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी समाजात जागृती करणे गरजेचे आहे. कारण अशा अफवेमुळेच  राईनपाड्यात निष्पाप जिवांची हत्या झाली. आहे, असे प्रतिपादन प्रा. नंदकुमार देशपांडे यांनी केले.

देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयाने राईनपाड्यात झालेल्या पाच निष्पाप भिक्षेकऱ्यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ संवेदना सभेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नंदकुमार देशपांडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ तिकटे डी. एस, होते.

या कार्यक्रमाचे आयोजन देशभक्त वार्षिकाचे संपादक प्रा. डॉ. विक्रम पवार यांनी केले होते. यावेळी या विषयाच्या अनुषंगाने  प्रा .के .बी . बनाटे यांनी इंटरनेटचा उपयोग विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक करावा अशी विंनती करुन त्यांचे दुरुपयोग कसे सुरू आहेत यांची माहिती सांगितली . या संवेदना सभेसाठी प्रा. व्ही.पी . लवटे, प्रा . एस.एस. गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्याक्रमाचे सुत्रसंचालन मुख्य संकल्पक  डॉ.पवार व्ही.आर. यांनी केले. तर आभार प्रा. एस.एस. जगताप यांनी मानले. 

Web Title: sanvedana meet for rainpada murder case