Vidhan Sabha 2019 ...म्हणून भाजप उपजिल्हाध्यक्ष, माजी आमदारांचे झाले निलंबन

Bhartiya janta party
Bhartiya janta party

सातारा : माण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांना पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना पाठिंबा दिल्याने माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांना भाजपतून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार ही कारवाई केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली.
 
माण मतदारसंघात बदलाचे वारे वाहू लागले असून, कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना भाजपकडून विधानसभेची उमेदवारी दिली. त्यांच्या विजयासाठी भाजपकडून सर्व प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हसवडला सभा घेऊन गोरेंना आमदार करा, त्यांना मंत्री करतो, अशी ग्वाही दिली. मात्र, मतदारसंघात वेगळीच गणिते सुरू होती. "आमदार गोरे हटाव'चा नारा देत सर्वपक्षीय "आमचं ठरलयं' आघाडीत भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर आणि अनिल देसाई सहभागी झाले. या "आमचं ठरलयं'मधून प्रभाकर देशमुख यांना सर्वानुमते अपक्ष रिंगणात उतरवण्यात आले आहे. भाजपचा उमेदवार असताना डॉ. येळगावकर व श्री. देसाई यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतली.

त्यामुळे त्यांच्यावर आज भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार त्यांच्यावर जिल्हाध्यक्षांनी शिस्तभंगाची कारवाई करत दोघांनाही निलंबित केले आहे. या कारवाईमुळे "आमचं ठरलंय'ला ऐन निवडणुकीतच भाजपने दणका दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com