आता तरी थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करा : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

"सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काेराेना व्हायरसशी लढताना केंद्र सरकारने काेणत्या उपाययाेजना कराव्यात याबाबत काही दिवसांपुर्वीच सूचविलेले हाेते. त्यात आमदार चव्हाण यांनी अनेक मुद्यांच्या माध्यमातून सूचना केल्या आहेत.

कराड : कोरोनामुळे केंद्र सरकारने प्रोत्साहनपर एक लाख 70 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. ते पॅकेज देशाच्या अर्थसंकल्पाच्या एक टक्‍क्‍यापेक्षा कमी आहे. देशाच्या अर्थसंकल्पाच्या आकारानुसार ते पॅकेज वाढवून दहा टक्‍क्‍यांपर्यंत म्हणजे 21 लाख कोटींपर्यंतचे पॅकेज दिले पाहिजे, अशी आपली पहिल्यापासून मागणी होती. ती मदत थेट लोकांच्या हातात पडली पाहिजे. यासाठी स्वंतत्र व्यवस्था राबवली पाहिजे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी "सकाळ'शी बोलताना केली. आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता देशाला उद्देशून संवाद साधला. त्यात त्यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्याअनुंषगाने चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

चव्हाण म्हणाले प्रगत देशांनी प्रोत्साहनपर पॅकेजवर त्यांच्या अर्थसंकल्पाच्या दहा ते 22 टक्‍क्‍यांपर्तंयचा खर्च केला होता. तुलनेत भारतात पॅकेज कमी होते. तो विरोधाभास सरकारच्या लक्षात आणून देण्यास यश आले. अमेरिकेने 10 टक्के, इंग्लडने 16, तर जर्मनीने 22 टक्के प्रोत्साहनपर पॅकेज जाहीर केले आहे. भारतात जाहीर झालेले प्रोत्साहनपर पॅकेज हे देशाच्या अर्थसंकल्पाच्या एक टक्काही नाही. ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढवले पाहिजे, अशा आग्रह धरल्याने केंद्राने 20 लाख कोटींपर्यंतचे पॅकेज जाहीर केले आहे. मदतीचा निर्णय अत्यंत चांगला आहे. केंद्र सरकारने आता धोरणात्मक काही गोष्टी करण्याची गरज आहे असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले.

दरम्यान यापुर्वी "सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काेराेना व्हायरसशी लढताना केंद्र सरकारने काेणत्या उपाययाेजना कराव्यात याबाबतीत सूचित केले हाेते. 

""देश व राज्यात बांधकाम मजूर कल्याण निधीच्या मोठ्या रकमा पडून आहेत. त्यात राज्यात आठ हजार कोटी, तर देशाच्या कल्याण निधीकडे जवळपास 31 हजार कोटींची रक्कम पडून आहे. त्याच्या पूर्ण उपयोग करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. त्या प्रत्येक घटकाला किमान पाच हजार रुपये त्यांच्या बॅकेच्या खात्यावर जमा करण्याची गरज आहे. त्याशिवाय देशभरात सुरू असलेले मजुरांचे स्थलांतर थांबणार नाही. मजुरांचे स्थलांतर कोरोनाच्या वाढीला पोषक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान मजुरांबाबत कल्याण निधीकडील रकमेचा योग्य वापर करावा. शेतकरी सन्मान योजनेची तीन महिन्यांची रक्कम एकाच वेळी त्यांच्या खात्यावर जमा करावी,'' अशीही सूचना श्री. चव्हाण यांनी केली हाेती.

Big Breaking : लॉकडाउन 4.0; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

आज (बुधवार, ता. 13 मे) सातारा जिल्ह्यात दारु दुकाने सुरु हाेणार आहेत. त्यापुर्वी उत्पादन शुल्क कार्यालयास गृह मंत्र्यांनी नेमके काय आदेश दिलेत वाचा सविस्तर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Citizen Should Get Amount Directly In Their Bank Account Says Congress Leader Prithviraj Chavan