Coronavirus : इस्लामपुर इफेक्ट; प्रशासन सतर्क, कऱ्हाडला नाकाबंदी

Coronavirus : इस्लामपुर इफेक्ट; प्रशासन सतर्क, कऱ्हाडला नाकाबंदी

कऱ्हाड ः येथून अवघ्या 35 किलोमीटरवरील इस्लामपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23 वर पोचली आहे. त्याचा प्रादुर्भाव कऱ्हाड तालुक्‍यात येऊ नये, यासाठी प्रशासन "हाय अलर्ट' झाले आहे. आरोग्य विभागासह पोलिसही सतर्क झालेत. इस्लामपूरहून येणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी नाकाबंदी केली आहे. पालिकेचे शंभराहून अधिक अधिकारी, कर्मचारी ऑनड्युटी आहेत. लोकांनी घाबरून जाण्याची आवश्‍यकता नाही, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
शहरात पुणे, मुंबईहून आलेल्या 331 लोकांना, तर परदेशातून आलेल्या जवळपास 35 लोकांना होम क्वारंटाईन केले आहे. त्या लोकांवर यंत्रणेचे 24 तास लक्ष आहे, अशा स्थितीत कऱ्हाडपासून अवघ्या 35 किलोमीटरवरील इस्लामपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचा प्रादुर्भाव कऱ्हाड तालुक्‍यात होऊ नये, यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे. आरोग्य विभागासह पोलिसांनाही तसे आदेश देण्यात आलेत. पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमेवर वाठार, शेणोली, उंडाळे, सुर्ली आदी ठिकाणी नाकाबंदी केली आहे. इस्लामपुरातून कऱ्हाडला येणाऱ्यांची सखोल तपासणी होत आहे. त्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.
 
संचारबंदीमुळे जिल्हा बंदी आहे. त्यामुळे नाकाबंदी आणखी कडक केली आहे. एकही वाहन सोडले जाणार नाही, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी दिली. पालिकेनेही तयारी केली आहे. 100 अधिकारी, कर्मचारी माहिती घेत आहेत. शहरात येणाऱ्यांसाठी तपासणी करण्यासाठी पथक तैनात केले आहे. त्याद्वारे येणाऱ्यांची चौकशी, नोंद होत आहे. पुणे, मुंबईहून आलेल्यांची तपासणी सुरू आहे. आशा, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने व पालिकेच्या कर्माचाऱ्यांतर्फे सर्व्हे सुरू आहे. वाढीव हद्दीतील भागात सर्व्हे राहिला आहे. तो पूर्ण होण्यासाठी अद्यापही एक दिवसाचा कालावधी लागेल. 

Coronavirus : साताऱ्यातील सव्वा वर्षाचा बालकासह युवकाचा रिपाेर्ट निगेटिव्ह 

  •  कऱ्हाडला पुणे, मुंबईचे 331, तर परदेशातून अलेले 35 लोक होम क्वॉरंटाईन 
  • जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अत्यंत कडक नाकाबंदी 
  • इस्लामपूरशी संबंधित लोकांची तपासणी 
  • नगरपालिकेचेही शंभर अधिकारी, कर्मचारी ऑन ड्युटी 
  • शहरात येणाऱ्या चारही नाक्‍यांवर तपासणीसाठी पथक तैनात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com