मोलाचे दाम देण्यात सातारा जिल्हा "टॉप' 

मोलाचे दाम देण्यात सातारा जिल्हा "टॉप' 

सातारा - मागेल त्याला काम देणारी योजना म्हणजे रोजगार हमी योजना आहे. या योजनेत वेळेवर मजुरी देण्यात सातारा, भंडारा, बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांनी 100 टक्‍के कामगिरी बजावली आहे. ऑनलाइन पध्दतीने मजुरी दिली जात असल्याने थेट मजुरांच्या खात्यावर ती जमा होत आहे. त्यामध्ये रायगड जिल्हा राज्यात मागे असून, केवळ 70.52 टक्‍के कामगारांना वेळेवर मानधन मिळत आहे. 

रोजगार हमी योजनेत सातारा जिल्ह्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत वैयक्‍तिक लाभाची व सार्वजनिक कामांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे मजुरांची संख्याही वाढत आहे. प्रति महिना सरासरी सहा हजार मजुरांच्या हाताला काम मिळत असते. यापूर्वी शासकीय स्तरावरून ही मजुरी मिळण्यास वेळ लागत असतो. त्यामुळे अनेक मजूर याकडे पाठ फिरवत होते. आता मात्र ऑनलाइन पध्दतीने मजुरी दिली जात असल्याने मजुरांना वेळेवर दाम मिळत असते. 

साताऱ्यासह भंडारा, बुलडाणा जिल्ह्यातील रोजगार हमी योजना विभागाने 100 टक्‍के मजुरांना वेळेवर मानधन दिले आहे. त्या पाठोपाठ नागपूरने 99.96 टक्‍के, नंदूरबारने 99.77 टक्‍के, यवतमाळने 98.82 टक्‍के, तर रायगडने 70.58 टक्‍के, जालनाने 74.92 टक्‍के मजुरांना वेळेत मानधन दिले आहे. राज्याची टक्‍केवारी 92.11, तर देशाची 92.12 टक्‍के आहे. 

""रोजगार हमी योजनेची सध्या वैयक्‍तिक, सार्वजनिक कामे सुरू आहेत. सुमारे साडेपाच हजार मजूर त्यावर कामे करत आहेत. त्यांना वेळेत मजुरी मिळण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहोत.'' 
-संजय पाटील,  उपजिल्हाधिकारी (रोहयो) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com