करवडीतील शेतकऱ्यांनी केली चक्क दुधाने आंघोळ

हेमंत पवार
बुधवार, 18 जुलै 2018

कऱ्हाड : दुध आंदोलनास आज (बुधवार) तिसऱ्या दिवशीही अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. अनेक दुध डेअरींनी दुध घातले नाही. मात्र आंदोलनाचे लोण आता गोवागावी पोचू लागले आहे.

नांदगाव (ता. कऱ्हाड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध टेम्पो अडवून दूध रस्त्यावर ओतले. त्यायानंतर पोलीस बंदोबस्तात दूधाची वाहतूक सुरु करण्यात आली तर तालुक्यातील करवडी गावातील शेतकऱ्यानी दुध डेअरीत न घालता चक्क दुधाने आंघोळ करुन आंदोलनाला पाठिंबा दिला. 

दूध दरासाठी तीन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी तीन दिवसापासुन दुध डेअरींना न घालता फुकट वाटून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे दूध संघांचे संकलन कोलमडले आहे. त्याचा शहरातील दूध वितरणावरही चांगलाच परिणाम झाला आहे.

दरम्यान आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी करवडी येथील शेतकऱ्यांनी चक्क दुधाने आंघोळ करुन दूध आंदोलनाला पाठिंबा दिला. 

Web Title: Satara Farmers supports Milk Agitation