सातारा जिल्ह्यात नदीत बुडून मुलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

सातारा: वेचले (ता. सातारा) येथे आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास उरमोडी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेली श्रावणी विठ्ठल कुंभार (वय 11) हिचा बुडून मृत्यू झाला.

उरमोडी नदी पात्रात अवैध वाळू उपशामुळे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत तिच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ग्रामसेवक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Satara: girl drowned in the river