पुणे बंगळूर महामार्गावरील दरोडा प्रकरणात सांगली जिल्ह्यातील तिघांना सक्तमजुरी

हेमंत पवार
Thursday, 16 July 2020

गुन्ह्यातील फरारी आरोपीचा पोलिसांनी शोध घ्यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला. 

कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सम्राट हॉटेलजवळ शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या तिघांना चार वर्षे सक्तमजुरी व 500 रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा सहायक जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी नुकतीच सुनावली.
सातारा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू; 119 कोरोनाबाधित

दरम्यान, गुन्ह्यातील फरारी आरोपीचा पोलिसांनी शोध घ्यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला. 
शिक्षा झालेल्यांत सुनील मारुती उबाळे (रा. वाळवा, जि. सांगली) विकास वसंत गुंड ऊर्फ निकम (रा. भाटवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) व प्रमोद मंगेश साठे (रा. वाटेगाव, जि. सांगली) यांचा समावेश असून, रवींद्र धर्माजी सूर्यवंशी (रा. आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हा फरारी असल्याची माहिती सरकारी वकील ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी दिली.
संपादन :  संजय शिंदे

ब्रेकिंग - कोल्हापूरात  पुरवठा कार्यालयात खळबळ : अधिकारी पॉझीटीव्ह, तीन दिवस कामकाज बंद

राष्ट्रवादीचा वादग्रस्त नेता साहीलचे अनेक राजकीय पुढारी व मंत्र्यांशी संबंध, फोटो व व्हिडिओ दाखवून करायचा फसवणूक, आता...

तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Imprisonment To Three People From Sangli District In Case Of Robbery On Pune Banglore National Highway