सातारा - कोल्हापूर पॅसेंजरचे डबे 12 करावेत यासाठी रुकडीत रेलरोको

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

रुकडी -  रेल्वे पॅसेंजरच्या डब्यांची संख्या 12 करावी यासाठी संतप्त प्रवाशांनी रुकडी येथे रेलरोको केला. सातारा - कोल्हापूर ही रेल्वे पॅसेंजर ( गाडी नं. 51441) प्रवाशांनी रोखून धरली. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला मोठा सहभाग होता. 

सातारा - कोल्हापूर रेल्वे पॅसेंजरला विद्यार्थी, व्यावसायिक व प्रवासी नोकरदारांची संख्या प्रचंड असते. मात्र या गाडीला केवळ आठच डबे आहेत. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी यातून प्रवास करतात. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या बारा करावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे  वारंवार करण्यात आली आहे. यास  रेल्वे प्रशासनाने दाद दिली नाही. यासाठी संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून आंदोलन केले. 

रेल्वे स्टेशन प्रबंधक पंकज कुमार चौधरी यांनी उद्यापासुन जादा डबे जोडण्याबरोबरच वेळेत गाडी सोडण्याचीही हमी दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara - Kolhapur passenger compartment issue Agitation in Rukadi