अन् उदयनराजेंना रडू कोसळले (व्हिडिओ)

अन् उदयनराजेंना रडू कोसळले (व्हिडिओ)

सातारा- कायम चर्चेत असलेले साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार खासदार उदयनराजे भावूक झालेले पहायला मिळाले. त्यांना एकदम रडूच कोसळल्याचे पाहायला मिळाले. अक्षय म्हात्रे या कार्यकर्त्यानं महाराजांवर तयार केलेलं गाणं राजे प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष प्रकाश भाई कोळी यांनी उदयनराजे भोसले यांना ऐकविले. हे गाणे ऐकून उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी आलेलं पहायला मिळालं. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असणारे उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची हटके स्टाईल, आक्रमकपणा किंवा डायलॉगबाजी नेहमीच पहायला मिळते. उदयनराजे यांचा हा कार्यकर्त्यांसोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून उदयनराजे भावूक झाल्याचे व त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हिडीओमध्ये उदयनराजे एका गाडीत बसलेले दिसतात. त्यावेळी त्यांना त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी रचलेलं आले रे, आले रे उदयनराजे हे गाणं ऐकवण्यात येतं. गाणं ऐकल्यावर उदयनराजेंनी आधी कपाळाला हात लावला. मात्र त्यानंतर उदयनराजे भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून आलेले पाणी त्यांना लपवता आले नाही. त्यांनी शर्टने डोळ्यातील पाणी पुसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे गाणं ऐकताना उदयनराजेंना आपले अश्रू रोखता आले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com