मी आणि माझ्या मतदारसंघातील सर्वजण विजयी झाल्यात जमा : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

लोकांनी निर्णय घेतला आहे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना मित्र पक्षांच्या हाती सत्ता द्यायची. हे सर्वच्या सर्व उमेदवार माझ्यासह मला खात्री आहे कारण मी फिरतो. लोकांपर्यंत जातो. लोकांना भेटतो. त्यांचा प्रतिसाद पाहून मी आणि माझ्या मतदारसंघातील सर्व उमेदवार हे विजयी झाल्यात जमा आहे.

सातारा : मी आणि माझ्या मतदारसंघातील सर्व उमेदवार हे विजयी झाल्यात जमा आहेत. मी ओव्हर कॉन्फिंडन नाही तर कॉन्फिंडली सांगतोय. गोपनीय रिपोर्टस पण तसे आहेत, असे मत भाजप शिवसेना मित्र पक्षाचे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. 

सातारा लोकसभा पोटनिडवणूक आणि विधानसभा निवडणूकीसाठी आज (सोमवार) मतदार उत्साहात मतदान करीत आहे. उदयनराजेंनी कुटुंबासह अनंत इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यानंतर पत्रकारांनी उदयनराजे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले पाच वर्षानंतर आपल्याला मतदानाचा हक्क बजाविण्याचा अधिकार मिळतो. आपल्या शहराला आपल्याला प्रगतीच्या दिशेने न्यायचे असेल तर मतदारांना विनंती आहे की कमळाचे चिन्ह असलेले बटन दाबावे. मी सकाळी नेहमी लवकर उठतो. चांगल्या सवयी असल्यामुळे. प्रत्येकाने सकाळी लवकर उठले पाहिजे. मी मतदान केले आहे. माझा मतदारसंघ मोठा आहे. दिवसभरात वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन आमदारकीच्या मतदानाचा आढावा घेणार आहे. 

लोकांनी निर्णय घेतला आहे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना मित्र पक्षांच्या हाती सत्ता द्यायची. हे सर्वच्या सर्व उमेदवार माझ्यासह मला खात्री आहे कारण मी फिरतो. लोकांपर्यंत जातो. लोकांना भेटतो. त्यांचा प्रतिसाद पाहून मी आणि माझ्या मतदारसंघातील सर्व उमेदवार हे विजयी झाल्यात जमा आहे. मी ओव्हर कॉन्फिंडन नाही तर कॉन्फिंडली सांगतोय. गोपनीय रिपोर्टस पण तसे आहेत. पाच वर्षाच्या कालावधीत नवीन चेहऱ्यांना संघटित करुन साताऱ्याच्या विकास साधेन. 

दरम्यान शिवेंद्रसिंहराजेंनी ही भाजप - शिवसेना मित्र पक्षाची सत्ता येईल असा विश्‍वास व्यक्त केला. शरद पवार यांच्या सभेचे चर्चा झाली हे खरे आहे परंतु मला साताऱ्यात वेगळा बदल झाला असे काही जाणवले नाही. कार्यकर्ते, नागरीकांमध्ये देखील वेगळ्या चर्चेचा सूर आलेला नाही. गावांमध्ये अथवा वॉर्डमध्ये बदल जाणवतोय असा या मतदारसंघात बदल झाला आहे असे काही वाटत नाही. 

सातारा जिल्ह्यातील बहुतांश नेते मंडळींनी कुटुंबियांसह सकाळीच मतदानाची प्रक्रिया पार पाडली आहे. यामध्ये आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर देशमुख, धैर्यशिल कदम आदींचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara MP Udyanraje Bhosale cast vote in Satara for Loksabha bypoll