उदयनराजेंचा आज निर्णय; दुसरीकडे जाणार की...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

भाजप प्रवेशाच्या लाटेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या संदर्भात साताऱ्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी महाराज भाजप प्रवेशाचा निर्णय एकदाचा घ्याच. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असे स्पष्ट केले होते. मात्र, उदयनराजेंनी अद्याप राजीनामा दिला नसल्याने भाजपमध्ये  जाण्याबाबत ठाम काही सांगता येत नाही. 

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भविष्यातील राजकारणाविषयी आज (सोमवार) निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्यात आज होणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार की भाजपमध्ये जाणार हे निश्चित होईल.

भाजप प्रवेशाच्या लाटेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या संदर्भात साताऱ्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी महाराज भाजप प्रवेशाचा निर्णय एकदाचा घ्याच. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असे स्पष्ट केले होते. मात्र, उदयनराजेंनी अद्याप राजीनामा दिला नसल्याने भाजपमध्ये  जाण्याबाबत ठाम काही सांगता येत नाही. 

निर्णय घ्यायचा असेल तर राजीनामा दिल्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. मुळात आता झालेल्या निवडणुकीत मताधिक्‍क्‍य कमी झाले. तसा हा पराभवच आहे. त्यामुळे सर्वांनी आत्मपरिक्षण करावे आणि निर्णय घ्यावा. आताच भाजप प्रवेश करावा असे काही नाही, असे त्यांनी म्हटले होते.

भाजपचे लोक अनेक दिवसांपासून माझ्या प्रवेशासाठी मागे लागले आहेत, असे सांगून उदयनराजे म्हणाले, माझ्याबद्दल विचाराल तर माझ्यावर 302, 307 चे गुन्हे दाखल झाले. खंडणीचाही झाला. हे सर्व होत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा काहीही बोलत नव्हते. त्यांनी पक्षातील कोणाला विचारले देखील नाही. त्यामुळे का राहायचे, कशासाठी राहायचे त्यांच्यासोबत, असा प्रश्‍न करून उदयनराजे म्हणाले, त्यांना आवर घालत नसाल तर उदयनराजेंनी काय समजायचे. त्यामुळे बदल झाला पाहिजे, असे स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara MP Udyanraje Bhosale takes political decision