नाशिकच्या युवकाने साताऱ्यात एकास ठेचले

नाशिकच्या युवकाने साताऱ्यात एकास ठेचले

सातारा : वाढे फाटा येथे बुधवारी (ता. 13) रात्री सायकल लपवल्याच्या कारणावरून दगडाने ठेचून युवकाचा खून झाला. या प्रकरणी संशयित वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दारूसह झालेल्या पार्टीनंतर हा प्रकार घडला. सूरज निगडे (वय 35, रा. वाढे, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे. दीपक दय्या (वय 29, मूळ रा. नाशिक, सध्या रा. वाढे फाटा) या ताब्यात घेतले आहे.
Video : होम क्वारंटाईनचा नियम पाळा अन्यथा... 
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेले 50 दिवस जिल्ह्यामध्ये दारूची विक्री बंद होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कालपासून सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीत दारूविक्री सुरू झाली. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर संधी मिळालेल्या अनेकांनी पार्टीचे नियोजन केले होते. तशाच पद्धतीने वाढे फाट परिसरात सूरज, दीपक व त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी पार्टीचे नियोजन केले होते. महामर्गालगतच्या एका झाडाखाली ही पार्टी सुरू होती. पार्टी झाल्यानंतर सायकल लपवल्याच्या कारणावरून दीपक व सूरज यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या वेळी दीपकने दगडाने सूरजच्या डोक्‍यात घाव घातले. त्यामुळे सूरज जागीच कोसळला. या वेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दीपक व अन्य लोक तेथून पसार झाले.
 
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे, हवालदार दादा परिहार, सुजित भोसले व अन्य कर्मचारी तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे काल रात्रीपासून संशयिताचा शोध सुरू होता. गुरुवारी सकाळी दीपकला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अन्य साथीदारांचा या गुन्ह्यात सहभाग आहे, की नाही याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू होती. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

भक्तांनो सावधान...माजी मुख्यमंत्री म्हणतात आता तुमच्यावर कारवाईच करतो

व्हॉट्‌सऍप ग्रुपचा वर्चस्ववादातून गोळीबार; पाच जणांना अटक


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com