नेत्रदानामुळे १९ जण पाहताहेत सृष्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

जिल्ह्यात वर्षभरातील यश; नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन 

सातारा - नेत्रदानाचा संकल्प केलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात १९ जणांना सृष्टी पाहता आली आहे. नेत्रदानामुळे मृत्यूनंतर माणसाला जिवंत राहता येत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा रुग्णालयातील नेत्रचिकित्सक डॉ. काटकर यांनी जागतिक दृष्टीदानदिनाच्या पार्श्‍वभूमीवर सांगितले.

माणसाच्या मृत्यूनंतरही काही तास डोळा हा अवयव जिवंत असतो. त्याचाच लाभ घेत दृष्टीहिन व्यक्तीला नेत्र बुबुळ रोपण करण्याची शस्त्रक्रिया पुढे आली. त्यामध्ये मृत व्यक्तीचा डोळा काही तासांच्या आत काढून तो गरजू व्यक्तीला बसविला जातो. जिल्ह्यामध्ये कृष्णा हॉस्पिटल (कऱ्हाड) व जिल्हा रुग्णालयामध्ये या शस्त्रक्रिया होतात. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात नेत्रदानाची चळवळ वाढत चालली आहे. मोठ्या संख्येने नागरिक नेत्रदानासाठी पुढे येत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातूनही त्यासाठी प्रबोधन करून जनजागृती केली जाते. युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही त्यात मोठा वाटा आहे. गेल्या वर्षभरात जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या माध्यमातून नेत्रदान करण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यातून अडीच हजार नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला. त्याबाबतचे फॉर्म जिल्हा रुग्णालयात त्यांनी भरून दिले आहेत.

नेत्रदानाबरोबरच जी व्यक्ती दृष्टीहिन झालेले असतात व नेत्ररोपणामुळे त्यांना दृष्टी मिळू शकते, अशांची जिल्हा रुग्णालयात नोंद केलेली असते. नेत्रदान केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडून जिल्हा रुग्णालयात कळविले जाते. त्यानंतर नेत्र विभागाचे वैद्यकीय अधिकारी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन नेत्र गोल काढून आणतात. त्याची तपासणी केली जाते. त्यानंतर आवश्‍यकता असलेल्या रुग्णांशी संपर्क केला जातो. जो रुग्ण तातडीने उपलब्ध होऊ शकतो, त्याला तो नेत्र गोल बसविला जातो. जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात नेत्रदान केलेल्या ५९ व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाशी संपर्क केला. ते नेत्रगोल काढून घेण्यात आले. तपासणीमध्ये १९ नेत्रगोल दुसऱ्या व्यक्तीला 
बसविण्यास योग्य असल्याचे समोर आले. त्यानुसार १९ दृष्टीहिन व्यक्तींना पुन्हा सृष्टी पाहण्यायोग्य करण्यात जिल्हा रुग्णालय नेत्र विभागाला यश आले आहे.

Web Title: satara news 19 people see by eye donate