सातारा जिल्ह्यातील ३०१ शाळांचे स्थलांतर?

विशाल पाटील
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

दहापेक्षा कमी पटसंख्या; १९४१ विद्यार्थी, ५८५ शिक्षक इतर शाळांत

सातारा - शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाठी आता दहा पटसंख्येच्या आतील शाळांवर संक्रांत येण्याची चिन्हे गडद बनली आहेत. कमी पटसंख्येपासून पाचशे मीटरवर असणाऱ्या या शाळांत येथील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग विचार करत आहे. परिणामी, जिल्ह्यातील तब्बल ३०१ शाळांमधील १९४१ विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात इतर शाळांमध्ये स्थलांतरित व्हावे लागणार आहे. 

‘आरटीई’नुसार प्रत्येक मूल शिकले पाहिजे, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करत आहे. मात्र, त्यासाठी सर्व शिक्षा अभियानासह विविध योजनांतून निधी देताना दोन्ही सरकारकडून आखडता हात घेतला जात आहे.

सध्या भाजप सरकारनेही विविध योजनांवरील खर्च कमी करण्यास प्राधान्य दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी २० पटसंख्येखालील शाळांतील विद्यार्थ्यांनी इतर शाळांना वाहनांद्वारे नेण्यासाठी सर्व्हे करण्यात केला होता. मात्र, ही संख्या कमी करत ती दहा पटसंख्येवर आणली जात आहे. त्यादृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून धोरणे राबविली जात आहेत. 

यापूर्वी सरकारने वाडीवस्त्यांवर शाळा आणि शाळा तेथे दोन शिक्षक अशी संकल्पना राबविली. लोकसंख्येचा विचार न करता दुर्गम, डोंगराळ वाडी-वस्त्यांवर प्राथमिक शाळा सुरू केल्या. त्यामुळे जिल्ह्यात सध्या दोन हजार ७१३ शाळा सुरू आहेत.

त्यापैकी तब्बल ३०१ शाळांतील पटसंख्या दहा किंवा दहापेक्षा कमी आहे, तरीही तेथे एक अथवा दोन शिक्षक असे एकूण ५८५ शिक्षक अध्यापनाचे काम करत आहेत. या शाळांत एक हजार ९४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांतील विद्यार्थी जवळच्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या शाळांत स्थलांतरित करून त्यांची ने- आण करण्याची व्यवस्था करण्याचा हालचाली सुरू असून, त्याला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथील एका कार्यक्रमात दुजोरा दिला होता. त्यामुळे हा बदल पुढील शैक्षणिक वर्षापासून होण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे.

पाटणमध्ये सर्वाधिक शाळा
पाटण तालुक्‍यात सर्वाधिक शाळा कमी पटसंख्येच्या असून, त्यापाठोपाठ जावळी, महाबळेश्‍वर तालुक्‍यांची स्थिती आहे. तालुकानिहाय दहापेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळांची संख्या पुढीलप्रमाणे : जावळी - ५०, कऱ्हाड - १८, कोरेगाव - १८, खटाव - १५, खंडाळा - ४, महाबळेश्‍वर - ४२, माण - १९, पाटण - ८८, फलटण - ५, सातारा - २८, वाई - १४.

शाळा - ३०१
शिक्षक -  ५८५
विद्यार्थी - १९४१

Web Title: satara news 301 school migration