आखाडीसाठी पंगती रंगू लागल्‍या!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सातारा - सरत्या आषाढाबरोबर ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही आखाडीसाठी पंगती रंगू लागल्‍या असून, पावसाच्या उघडिपीत आखाड्या जोरात सुरू आहेत. ग्रामीण भागातील आठवडे बाजारात काळ्या अन्‌ ‘उलट्या पिसां’च्या कोंबड्यांचा भाव वधारला आहे. एरव्ही दोन- तीनशे रुपयांना मिळणाऱ्या सर्वसाधारण काळ्या कोंबडीसाठी चक्क ७०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत.

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी पेरण्या उरकलेल्या आहेत. त्यामुळे आषाढातील ‘देणगती’ महिन्यातील पहिल्या रविवारपासून सुरू झाल्या आहेत. बहुतेक नागरिक श्रावण ‘पाळत’ असल्याने पूर्व परंपरेने आषाढ निवडला गेला आहे. गेले तीन आठवडे सवड मिळेल, त्याप्रमाणे या आखाडी जत्रा सुरू आहेत. गावोगावी मांसाहारी जेवणांचा घमघमाट सुटत आहे.

मोठ्या प्रमाणावर चाललेल्या या आकाडी यात्रांमुळे आठवडे बाजारात कोंबड्या- बकऱ्यांचे दर वाढले आहेत. तीनशे रुपयांपर्यंत मिळणारा कोंबडा आता ५०० ते ८०० रुपयांपर्यंत गेला आहे, तर आठ- दहा किलोचे बकरे नऊ हजारापर्यंत विकले जात आहे. कोंबडीची २०- २५ रुपयांना मिळणारी पिले आता मालक ५० रुपयांपर्यंत  किमती सांगत आहेत. जिल्ह्यात कऱ्हाड, तारळे, सातारा, लोणंद, म्हसवड, वाई, खंडाळा परिसरातील कोंबड्या बकऱ्यांचे बाजार ‘फुल्ल’ चालले आहेत. आषाढातील देणगतीतही बऱ्याच तऱ्हा आषाढातील या देणगतीतही बऱ्याच तऱ्हा आहेत. काही भुताखेतांना, देवांना कोंबडा-कोंबडी ही काळ्या रंगाचीच लागते, तर काही देणगतींना उलट्या पिसांची कोंबडी हवी असते. काळ्या रंगाच्या कोंबड्यांना इतर कोंबड्यांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत, तर उलट्या पिसांच्या कोंबड्या अभावानेच असल्याने संबंधित मालक ग्राहकांची नड पाहून मनाला येईल तो दर सांगत आहेत. किलोभरही वजन नसणाऱ्या अशा कोंबड्यासाठी सध्या ५०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहे. मात्र, पैसे कितीही मोजावे लागले तरी नागरिक त्यात कमी पडत नाहीत. मोठ्या हौसेने या यात्रा करत आहेत. गावोगावी या देणगती जोरात सुरू आहेत.

Web Title: satara news aakhad

टॅग्स