रायगड जिल्ह्यातील दोघे उंब्रजजवळ अपघातात ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

उंब्रज -  इंदोली फाटा येथे भरधाव जाणाऱ्या टेम्पोची महामार्गाकडेला उभ्या असणाऱ्या अज्ञात वाहनाला पाठीमागून भीषण धडक बसली. त्यात टेम्पोचालकासह दोघे जण ठार झाले. पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. शांताराम यशवंत शिंदे (वय 35, रा. घोडगाव, जि. रायगड) व संजय सीताराम मोहिते (48, रा. पळसगाव, जि. रायगड) अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी सांगितले, की साताऱ्याहून कोल्हापूरकडे कोंबड्यांची पिले घेऊन जाणारा भरधाव आयशर टेम्पो (एमएच 06 एचजी 4953) अज्ञात वाहनाला धडकला. त्यात टेम्पोचा चालक शांताराम शिंदे व प्रवासी संजय मोहिते जागीच ठार झाले. अपघाताची माहिती येथील व महामार्ग पोलिसांसह देखभाल दुरुस्ती विभागास कळाली. त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन मदतकार्यास सुरवात केली. धडक इतकी भीषण होती, की टेम्पोच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन त्यात मृत अडकून पडले होते. पोलिसांनी क्रेन बोलावून आत अडकलेले मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर महामार्ग देखभाल विभागाच्या रुग्णवाहिकेतून मृतांना शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. 

Web Title: satara news accident