घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘अजेंडा’

घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘अजेंडा’

सातारा - स्वच्छ भारत अभियानातील दुसरा टप्पा असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कंबर कसली आहे. घनकचरा व्यवस्थानासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१७ गावांची निवड केली असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नवीन वर्षात केली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचनाही संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. 

शहरालगतच्या, मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा ही समस्या मोठी झाली आहे. बनवडी (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापनात प्रभावीपणे काम केले आहे. तसेच काम जिल्ह्यातील लोकसंख्येने मोठ्या व पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या २१७ ग्रामपंचायतींत करण्यासाठी जिल्हा परिषद आग्रही आहे. या ग्रामपंचायतींतील सरपंच, ग्रामसेवकांना नुकतेच बनवडी येथे घनकचरा व सांडपाणी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुख, आदर्श सरपंच, ग्रामसेवक, महाविद्यालयाचे प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विस्तार अधिकारी आदींची समिती तयार करून त्यामार्फत हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. एक जानेवारीपासून या प्रकल्पाची कार्यवाही सुरू करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक संपर्क अधिकारी निवडण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा प्रकल्प राबविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी गाव पातळीवर एक समिती करून आठवडा, पंधरवडा व महिन्यातून या कामाचा आढावा घेतला जाईल. भविष्यात सांडपाण्यासाठी शोषखड्डे, परसबागा करणे, सांडपाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर करणे आदी प्रकल्प राबविले जातील, असे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. 

शोषखड्ड्यांसाठी तीन टप्पे
सांडपाणी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात २१७ गावांमध्ये कुटुंबाकुटुंबांत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून खर्च केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरालगतच्या टप्प्यात ग्रामपंचायती, तर तिसऱ्या टप्प्यात नदीकाठांवरील गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी शोषखड्डे घेतले जातील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 

...असा आहे अजेंडा
 घनकचरा प्रकल्पासाठी जागेची निवड करणे 
 कुटुंबात ओला, सुका कचरा वेगळा करणे
 संकलनासाठी बचतगट, कर्मचारी नेमणे
 ओल्या कचऱ्यापासून गांडूळखत करणे
 विक्रीयोग्य कचऱ्याची विक्री करणे
 गावपातळीवर समिती गठित करणे
 ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे

चाळीस कोटी वसुलीचे ग्रामपंचायतींपुढे उद्दिष्ट
करवसुलीतून ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढत असल्याने या वर्षी ग्रामपंचायतींनी करवसुलीचा धडाका सुरू केला आहे. नोव्हेंबरअखेरीस सुमारे ५० कोटी वसूल केले आहेत. मार्चअखेरीस ४० कोटी वसुलीचे उद्दिष्ट राहणार आहे. चालू महिन्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत करवसुलीला फायदा होऊन एका दिवसात तब्बल चार कोटी करवसुलीपर्यंत मदार गेली आहे. या वेळी वसुलीत सध्या कऱ्हाड तालुक्‍याने भरारी घेत ६६ टक्‍के करवसुली केली आहे. 

ग्रामपंचायतींमध्ये दोन वर्षांपासून भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायतींच्या विकासाचा गाडा चालविण्यासाठी ग्रामपंचायतींनी घरपट्टी, पाणीपट्टी वसुली महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे हे कर वसुलीवर प्रामुख्याने भर दिला जातो. पान २ वर 

आकडे बोलतात... 
तालुकानिहाय नोव्हेंबरअखेरची घरपट्टी वसुली (आकडे लाखांत) 
सातारा : ६१३.४२, कोरेगाव : १५६.३५, खटाव : २४१.१४, माण : ९१.५७, फलटण : ३३२.४१, खंडाळा : २८०.३८, वाई : १३७.०१, जावळी : ८१.४१, महाबळेश्‍वर : ७८.३०, कऱ्हाड : ८४७.९२, पाटण : २९२.६६, एकूण : ३१५२.५७. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com