टोल व्यवस्थापन तूर्त जैसे थे; साताऱयातील तणाव निवळला

सिध्दार्थ लाटकर 
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सातारा - साताऱ्यानजीकच्या आनेवाडी टोलनाक्‍याचे व्यवस्थापन न बदलण्याचा निर्णय झाल्याने साताऱयातील तणाव मध्यरात्री निवळला.

टोलनाका व्यवस्थापन पुढील आदेश येईपर्यंत जैसे थे राहणार असल्याचे समजल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक टोलनाक्यावरून हटले. व्यवस्थापन बदलायचे नाही, ही भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांचे समर्थक व्यवस्थापन बदलण्याची मागणी करीत आहेत.

सध्याच्या कंपनीकडील टोल व्यवस्थापन पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवावे, अशा आशयाचा ई मेल व्यवस्थापन कार्यालयात प्राप्त झाला असल्याची माहिती पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, तहसिलदार रोहिणी आखाडे (मेढा) यांना व्यवस्थापनाने दिली.

त्यापूर्वी, संध्याकाळपासून या प्रश्नावरून शहरात तणाव होता. टोल व्यवस्थापन बदलण्यासाठी प्रक्रिया आज होणार असे समजल्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून खासदार उदयनराजे भोसले यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना काढण्याची शक्‍यता असल्याने टोलनाका कार्यालयात ठिय्या मांडला होता. रात्री खासदार साताऱ्याकडे आले. दरम्यान रात्री 11 वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरूची बंगल्यावर सुमारे 80 ते 90 चार चाकी वाहने जमली होती. रात्री 11.15 च्या सुमारास आमदारांसह ही सर्व वाहने समर्थकासह आनेवाडी टोलनाक्‍याकडे येऊ लागली. मात्र, पोलिसांच्या विनंतीनंतर वाहने पुन्हा साताऱयाकडे नेण्यात आली.  

साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या ठिकाणी उदयनराजेंचे समर्थक उभे होते.

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मोठ्या संख्येने पोलिसही टोलनाक्यावर होते. दरम्यान दोन्ही राजेंचे समर्थक जमण्याच्या शक्यतेने तणाव वाढला होता. दोन्हीकडून येणारी वाहने नि:शुल्क सोडली जात होती.

Web Title: satara news anewadi toll naka issue