कऱाडः रस्ता दुभाजक जाहिरात घोटाळा प्रकरणी आत्मदहनाचा इशारा

सचिन शिंदे
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

कऱ्हाड (सातारा): येथील रस्ता दुभाजक जाहिरात घोटाळा प्रकरणात राज्य शासन जाणीवपूर्वक निकाल देत नाही. त्या निषेधार्थ येथील सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज बागवान यांनी १५ ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई येथील हुतात्मा चौकात ते आत्मदहन करणार आहेत, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनातील माहिती अशी- शासनाकडे २०१५ मध्ये दुभाजक प्रश्नी तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्याचा अद्यापही निकाल दिलेला नाही. प्रांतांधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त, मंत्रालय सचिव या पातळ्यांवर टोलवा टोलवी सुरू आहे. येथील विजय दिवस चौक ते कृष्णा नाका रस्ता दुभाजक विकसीत करून त्यातील जाहीरात ठेका प्रकरणात स्थायी समितीने पालिकेच्या हिता विरोधात व पालिकेचे आर्थिक नुकसान करणारा ठराव केला आहे, अशी तक्रार श्री. बागवान यांनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी नगरविकास विभागाकडे केली होती. त्यात पालिकेचे निकसान करणाऱ्या नऊ सदस्यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र तसे झालेल नाही. प्रांताधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल दिला आहे. तो त्यांनी विभागीय आयुक्त व आयुक्तांना पाठवला आहे. तेथून तो नगरविकास विभागाकडे गेला आहे. त्याच्या १० फेब्रुवारू २०१७ ला संबधीत नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीसा आल्या होत्या. त्याची मंत्री रणजीत पाटील यांच्यासमोर सुनावणीही झाली होती. मात्र, अडीच महिने उलटले तरी त्याचा निकाल न लागल्याने तक्रारदार बागवान यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Web Title: satara news Auto-hit alert in road divider advertising scam case