भाजपच्या शिलेदारांकडून जनतेचा घात 

सिद्धार्थ लाटकर 
शुक्रवार, 9 जून 2017

सातारा ः वाईच्या (भारतीय जनता पार्टी) नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे व त्यांचे पती सुधीर यांना आज (शुक्रवार) 14 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. हे वृत्त अवघ्या काही मिनिटांत राज्यभरात पसरले. त्याचे पडसाद वाई पालिका व शहरात तीव्र स्वरूपात उमटू लागले आहेत. 

वाई पालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून डॉ. शिंदे या अवघ्या एक मताने विजयी झाल्या होत्या. त्याचा राज्यभर गवगवा झाला होता. त्यांच्या या कृत्याचा विरोधी पक्ष निषेध व्यक्त करू लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा जिल्ह्यात वर्चस्व असताना भाजप येथे आपली पाळेमुळे रुजवू पाहता होता. मात्र या कृत्यामुळे भाजपच्या प्रतिमेस ही धक्का बसला आहे.

तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटनेते भारत खामकर म्हणाले एक सुशिक्षित, सुस्कृंत अशा डॉक्‍टरी पेशात असलेल्या प्रतिभा शिंदे यांना जनतेने विश्‍वासाने निवडून दिले. त्यांच्या कृत्याने जनतेचा विश्‍वासघात झाला आहे. आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी या प्रकाराचा निषेध करीत आहोत. 

"संबंधित तक्रारदाराचा शौचालयाच्या बांधकामाच्या कामाशी संबंध नाही. त्याच्या माध्यमातून राष्ट्रवादीने षडयंत्र रचले आहे. डॉ. शिंदे यांना सुरळीत कारभार करून द्यायचा नाही यासाठी त्यांना अडकविण्यात आला आहे. लवकरच दूध का दूध पानी का पानी होईल,'' असे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार यांनी सांगितले. 

- वाई पालिका पक्षीय बलाबल सदस्य संघ 
तीर्थक्षेत्र विकास आघाडी (राष्ट्रवादी प्रणीत) 14 
वाई विकास महाआघाडी (सर्व पक्ष)06 
नगराध्यक्ष थेट जनतेतून (भाजप) ः डॉ. प्रतिभा शिंदे

Web Title: Satara News: BJP bribe crime