मांढरदेवच्या काळ्या बाहुल्या 'अंनिस' काढून टाकणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

सातारा - मांढरदेवी मंदिराच्या मागील बाजूस झाडांना काळ्या बाहुल्या, लिंबू, चिठ्ठ्या लावून ठोकण्यात आलेले खिळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे येत्या 30 डिसेंबरला काढून टाकण्यात येणार आहेत.

सातारा - मांढरदेवी मंदिराच्या मागील बाजूस झाडांना काळ्या बाहुल्या, लिंबू, चिठ्ठ्या लावून ठोकण्यात आलेले खिळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे येत्या 30 डिसेंबरला काढून टाकण्यात येणार आहेत.

यासंदर्भातील एक निवेदन समितीतर्फे वाई पोलिसांना देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, की अशा अनिष्ठ, अघोरी प्रथांमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्यात दक्षता अधिकारी नेमण्यात आला आहे. अशा प्रकारच्या तांत्रिक, मांत्रिक, अनिष्ठ व अघोरी प्रकाराविरोधात या कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करता येतो. "अंनिस'चे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते 30 तारखेला सकाळी 11 वाजता मांढरदेव परिसरात असणाऱ्या झाडांना ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढणार आहेत.

Web Title: satara news black doll remove by anis