रमजान ईदनिमित्त इंटरनेट प्लॅन ७८६

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

सातारा - रमजान ईदनिमित्त भारत संचार निगम लिमिटेडने मोबाईलद्वारे इंटरनेट वापरकर्त्यांसाठी प्लॅन ७८६ आणि प्लॅन ५९९ असे दोन नवीन प्लॅन बाजारात आणले आहेत. प्लॅन ७८६ मध्ये ग्राहकास दररोज चार जीबी डेटा मिळणार आहे. त्याची वैधता ९० दिवसांची आहे. तसेच  प्लॅन ५९९ मध्ये एकूण ७८६ रुपयांचा टॉकटाईम ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये ५०७ रुपयांचा  टॉकटाईम मुख्य अकाउंटमध्ये समाविष्ट होणार तर त्यातील २७९ रुपयांचा टॉकटाईम हा ३० दिवसांकरिता असेल.

या प्लॅनमध्ये दहा लोकल संदेश ही देण्यात आले आहेत. प्रीपेड ग्राहकांसाठी ३३३ रुपयांऐवजी चौका असा ४४४ रुपयांचे  स्पेशल टेरिफ व्हॉऊचर बाजारात आणले आहे. यामध्ये ग्राहकास दररोज चार जीबी डेटा मिळत आहे. त्याची वैधता ९० दिवसांची आहे. याबरोबरच ६० रुपये, ११० रुपये, २१० रुपये तसेच २९० रुपये असे पूर्ण टॉकटाईम देणारे व अधिक टॉकटाईम देणारे व्हॉऊचर्स ही ‘बीएसएनएल’ने आणले आहेत.

Web Title: satara news BSNL ramzan eid Internet Plan 786

टॅग्स