जिल्हा परिषद शाळा प्रवेशासाठी ‘कॅम्पेनिंग’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

सीईओंसह अधिकारी होणार सहभागी; शाळांची होणार जाहिरात
सातारा - इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मराठी शाळांपुढे ‘करा या मरा’ची अवस्था उभी केली आहे. यातही बाजी मारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी गुणात्मक, भौतिक बाबतही तयारी केली आहे. १५ जूनपासून शाळा सुरू होत असून, यात जिल्हा परिषदांच्या शाळांत प्रवेश वाढावेत, यासाठी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक ‘कॅम्पेनिंग’ करणार आहेत. त्याबरोबर पहिली प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या घरांपर्यंत शाळांची गुणवत्ताही पोचविली जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या सध्या गुणवत्तेबरोबर भौतिक दर्जाही उंचावत आहे. अनेक शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षाही कित्येक पटीने दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमातही सातारा जिल्ह्यातील अनेक शाळांनी बाजी मारली आहे, तरीही अनेक पालक इंग्रजीच्या हव्यासापोटी पाल्यांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश घेत असतात. एव्हाना इंग्रजी माध्यमांच्या शाळांनीही विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही संस्थाचालकांनी शिक्षकांना त्याच मोहिमेवर धाडले आहे, तसेच शाळांची जाहिरातबाजीही जोरात केली जात आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शिक्षण विभागही सज्ज झाला आहे. 

सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचा जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश व्हावा, यासाठी सर्व शिक्षक प्रत्येक मुलांच्या घरी गृहभेटी देणार आहेत. त्यात शाळेतील गुणवत्ता, भौतिक दृष्टीने झालेली प्रगतीही पालकांना सांगणार आहेत. शिवाय, दर्शनी भागांमध्ये शाळांमध्ये असलेल्या विशेषतांची जाहिरातबाजीही केली जाणार आहे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच काही जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही ‘मिशन ॲडमिशन’वर लक्ष केंद्रित करणार आहेत. ही मोहीम प्रभावीपणे राबविल्यास त्याचा फायदाही प्रवेश वाढण्यास, तसेच वरिष्ठ वर्गातील प्रवेश टिकण्यास होणार आहे.

शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी शंभर टक्‍के शाळा डिजिटल करणार आहोत. पहिलीतील प्रवेश वाढविण्यासाठी मी स्वत: आठवडाभर शाळा पातळीवर प्रयत्न करणार असून, शिक्षकही प्रत्येक मुलांच्या कुटुंबापर्यंत शाळेची माहिती देतील.
- डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: satara news campaign for zp school admission