‘सकाळ’तर्फे दोन जूनपासून करिअर प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

रजतसागर मंगल कार्यालयात आयोजन; स्टॉल बुकिंगला अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद 

रजतसागर मंगल कार्यालयात आयोजन; स्टॉल बुकिंगला अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद 

सातारा - नर्सरीपासून पदवी, पदव्युत्तर आणि दहावी, बारावी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी कोणत्या संधी आहेत, यासंबंधीची सखोल माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने क्रिएटिव्ह ॲकॅडमी (आकुर्डी, पुणे) प्रस्तुत सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज करिअर प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. येत्या दोन जूनपासून चार जूनअखेर पोवई नाक्‍यावरील रजतसागर मंगल कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. नानासाहेब महाडिक टेक्‍निकल कॅम्पस (पेठनाका, जि. सांगली) हे या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत.

सातारा, सांगलीसह कोल्हापूर आणि पुण्या-मुंबईतील दर्जेदार शिक्षण संस्थांचा समावेश यामध्ये असेल. स्टॉल बुकिंगला प्रारंभ झाला आणि अल्पावधीतच त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दहावी, बारावीची परीक्षा झाली. गुणांची यादी हाती येईल. क्षमता कळेल पण, पुढे काय, असा भलामोठा प्रश्‍न पडेल. कोणते क्षेत्र निवडायचे, करिअर कशात करायचे, या प्रश्‍नासाठी एज्यु ॲडव्हान्टेज हे प्रदर्शन लाभदायी ठरले आहे. मनातील साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे येथे मिळून जातील. मग करिअरच्या वाटा सोप्या होतील. तज्ज्ञांचाही मौलिक सल्ला व्याख्यानांच्या माध्यमातून दिला जाईल.

नर्सरी ते पदवीपर्यंत तसेच विविध कोर्सेसमध्ये करिअरच्या संधी कोणत्या आहेत, नेमके कोणते कौशल्य हवे आणि त्यासाठी नेमके काय शिकायला हवे, या संभ्रमावस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी अशा प्रदर्शनाची परंपरा ‘सकाळ’ने काही वर्षांपासून सुरू केली आहे. त्याला दरवर्षी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शन विद्यार्थ्यांना ‘राइट चॉइस ऑन राइट टाइम’च ठरणार आहे. प्रदर्शनात करिअर मार्गदर्शन, शिक्षण संधीबाबत तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, समुपदेशन होणार आहे. अभियांत्रिकीच्या विविध शाखा, सॉफ्टवेअर, फार्मसी, एमबीए, माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग, हॉटेल मॅनेजमेंट, ॲबॅकस, ॲनिमेशन, फायर अँड सिक्‍युरिटी आदी व्यावसायिक अभ्यासक्रम आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असेल. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचेही स्टॉल असतील. इतर विविध विद्या शाखांसाठी विविध उपयुक्त दर्जेदार क्‍लासेसचाही समावेश प्रदर्शनात असेल. शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बॅंकांचीही माहिती येथे दिली जाणार आहे. ‘सकाळ’ने घेतलेल्या अशा प्रदर्शनात हजारो विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद मिळाला. यंदा प्रथमच लहान मुलांच्या इंग्लिश माध्यम स्कूलचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे.

अधिक माहितीसाठी...
सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज प्रदर्शनासाठी स्टॉल बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोजकेच स्टॉल शिल्लक आहेत. इच्छुक शैक्षणिक संस्थांनी अधिक माहितीसाठी राहुल पवार (९९२२९१३३४५), प्रदीप राऊत (९९२३२३३९९९), प्रभाकर पवार (८८८८८०१२४५), विवेक लाटे (९९२२९१३२५८) यांच्याशी संपर्क साधावा. कऱ्हाड येथेही सहा ते आठ जून या कालावधीत यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाउन हॉल) येथे सकाळ एज्यु ॲडव्हान्टेज प्रदर्शन होणार आहे. बुकिंगसाठी संपर्क साधावा.

Web Title: satara news career exibition by sakal